Homeताज्या बातम्याआळंदी कार्तिकी यात्रा २०२५ : भाविकांसाठी सेवा-सुविधांची कामे वेळेत पूर्ण करा —...

आळंदी कार्तिकी यात्रा २०२५ : भाविकांसाठी सेवा-सुविधांची कामे वेळेत पूर्ण करा — प्रांताधिकारी अनिल दौंडे

(आळंदी प्रतिनिधी रवी कदम)                        आळंदी कार्तिकी यात्रा २०२५ : भाविकांसाठी सेवा-सुविधांची कामे वेळेत पूर्ण करा — प्रांताधिकारी अनिल दौंडे

कार्तिकी यात्रेसाठी प्रशासन सज्ज; लाखो भाविकांच्या स्वागतासाठी आरोग्य, पाणीपुरवठा, वाहतूक, सुरक्षा यंत्रणा सक्षम: श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्त येथील कार्तिकी यात्रा २०२५ साठी प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. यात्रेच्या काळात भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सर्व शासकीय विभागांनी सेवा-सुविधांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश खेडचे प्रांताधिकारी अनिल दौंडे यांनी दिले.

आळंदी नगरपरिषद सभागृहात झालेल्या यात्रा नियोजनपूर्व आढावा बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करण्यात आली. प्रांताधिकारी दौंडे यांनी आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, दर्शनबारी व्यवस्था, वाहतूक नियंत्रण यांसारख्या सेवांवर विशेष भर देण्याचे निर्देश दिले.

बैठकीस श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, माजी नगरसेवक डी.डी. भोसले पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, तसेच विविध विभागांचे अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी बैठकीचे संचालन करून उपस्थितांचे स्वागत केले.

🚦 प्रशासनाची तयारी

यात्रेचा कालावधी: १२ ते २० नोव्हेंबर २०२५

अपेक्षित भाविक संख्या: १५ ते २० लाख

पोलीस बंदोबस्त: १५० अधिकारी, ११०० अंमलदार, ६०० अतिरिक्त जवान

आरोग्य सेवा: २४ तास सेवा, ५ ICU बेड, १० वैद्यकीय पथके, १०८ व १०२ रुग्णवाहिका, साथरोग नियंत्रण कक्ष

महावितरण: अखंड वीजपुरवठा व जुन्या तारांची दुरुस्ती

पाटबंधारे विभाग: नदीत १५० क्युससेस क्षमतेने पाणी सोडणे

नगरपरिषद: दर्शनबारी, मंडप, वॉच टॉवर, सीसीटीव्ही, अतिक्रमण निर्मूलन — सर्व कामे १० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण

🧘 भाविकांसाठी विशेष सुविधा

जिल्हा परिषद मार्फत १८००, नगरपरिषद मार्फत १००० मोबाईल टॉयलेट्स

शहरात ५ फिलिंग पॉइंट्स, NDRF च्या २ टीम्स, अग्निशमन वाहने

भोजन व्यवस्था व अतिरिक्त विद्युत रोषणाई

रथोत्सवाच्या काळात प्रदक्षिणा मार्गावर जनरेटरद्वारे वीजपुरवठा

🗓️ पुढील बैठक

अंतिम आढावा बैठक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार असल्याचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी प्रांताधिकारी दौंडे यांच्या परवानगीने जाहीर केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आयएलएस लॉ कॉलेजने AY 2026-27 साठी पुणे विद्यापीठाच्या ‘एकतर्फी मान्यता’ विरोधात उच्च न्यायालयात धाव...

0
कातडयाचा: विद्यापीठात राहण्याची मागणी; AY 2025-26 मध्ये गोळा केल्याप्रमाणे इतर फी चालू ठेवणे आणि कोणत्याही जबरदस्तीच्या कारवाईवर प्रतिबंधILS लॉ कॉलेज कथा -...

रखडलेल्या परवानग्या उघड करण्यासाठी पीएमआरडीएने 12-18 महिन्यांत स्ट्रक्चरल प्लॅन आणण्यास सांगितले

0
नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, पाच मंजूर नगररचना योजना पीएमसीकडे हस्तांतरित करण्याचे काम सुरू आहे पुणे : प्राधिकरणाचा प्रारूप विकास आराखडा...

पुणे स्थानकाची गर्दी कमी करण्यासाठी आळंदीत मेगा कोचिंग टर्मिनल

0
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी पुण्यात पुणे : पुणे रेल्वे स्थानकाची गर्दी कमी करण्यासाठी आळंदीतील मेगा कोचिंग टर्मिनलसह विस्तारीकरणाच्या योजनांचे बुधवारी रेल्वेमंत्री अश्विनी...

फ्लॅट खरेदीदारांची ५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डरवर गुन्हा दाखल

0
या रखडलेल्या प्रकल्पात 150 हून अधिक ग्राहकांनी अंदाजे 50 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पुणे : वाघोली पोलिसांनी शहरातील बांधकाम व्यावसायिक...

Translate »
error: Content is protected !!