Homeताज्या बातम्या८१ वर्षाच्या नागरिक ग्रामसभेत मारल्या जातात खुनाचा प्रयत्न केले

८१ वर्षाच्या नागरिक ग्रामसभेत मारल्या जातात खुनाचा प्रयत्न केले

📰 ग्रामसभेत ज्येष्ठ नागरिकाच्या जीवावर हल्ला; सुरक्षा करण्याची मागणी

विव्हेवाडी (पुरंदर), जि. पुणे : (प्रतिनिधी अशोक कुंभार)

ग्रामपंचायत कार्यालयाजवळ शुक्रवारी (दि. 3 ऑक्टोबर 2025) सकाळी ग्रामसभेदरम्यान एका ज्येष्ठ नागरिकाच्या जीवावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नळाला पाणी न येण्याबाबत साधी विचारणा केली असता ग्रामपंचायतीचा शिपाई ज्ञानोबा लक्ष्मण भगत याने संबंधित नागरिकाचा गळा आवळल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घटनेत पीडित नागरिकाचा श्वास रोखला जाऊन त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. दोन तास बोलता येत नसल्याचे पीडितांनी सांगितले. या प्रसंगी सुरेश कारकुंडे, प्रभाकर चिव्हे व अन्य काही व्यक्तींनी धमक्या देत खून करण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पीडितांच्या म्हणण्यानुसार वर्ष 2020 पासून गावातील काही पुढारी प्रवृत्तीच्या व्यक्ती सतत बेकायदेशीर बैठक घेत असून गावात भांडण, गटबाजी आणि दहशतीचे वातावरण निर्माण करत आहेत. ग्रामस्थ वसंत डोंगरे, भाऊ बारणे, बाजीराव बार्शीलकर, बाळू गवारे इत्यादींच्या समोर हा प्रकार घडल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

घटनेनंतर पीडिताने आपल्या जीवितास व कुटुंबाच्या सुरक्षेस गंभीर धोका असल्याचे सांगत संबंधित आरोपींवर तातडीने कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. तसेच भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास यास सर्व आरोपी जबाबदार असतील, असेही पीडिताने निवेदनात म्हटले आहे.

गावात सलग सुरू असलेल्या गटबाजीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आयएलएस लॉ कॉलेजने AY 2026-27 साठी पुणे विद्यापीठाच्या ‘एकतर्फी मान्यता’ विरोधात उच्च न्यायालयात धाव...

0
कातडयाचा: विद्यापीठात राहण्याची मागणी; AY 2025-26 मध्ये गोळा केल्याप्रमाणे इतर फी चालू ठेवणे आणि कोणत्याही जबरदस्तीच्या कारवाईवर प्रतिबंधILS लॉ कॉलेज कथा -...

रखडलेल्या परवानग्या उघड करण्यासाठी पीएमआरडीएने 12-18 महिन्यांत स्ट्रक्चरल प्लॅन आणण्यास सांगितले

0
नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, पाच मंजूर नगररचना योजना पीएमसीकडे हस्तांतरित करण्याचे काम सुरू आहे पुणे : प्राधिकरणाचा प्रारूप विकास आराखडा...

पुणे स्थानकाची गर्दी कमी करण्यासाठी आळंदीत मेगा कोचिंग टर्मिनल

0
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी पुण्यात पुणे : पुणे रेल्वे स्थानकाची गर्दी कमी करण्यासाठी आळंदीतील मेगा कोचिंग टर्मिनलसह विस्तारीकरणाच्या योजनांचे बुधवारी रेल्वेमंत्री अश्विनी...

फ्लॅट खरेदीदारांची ५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डरवर गुन्हा दाखल

0
या रखडलेल्या प्रकल्पात 150 हून अधिक ग्राहकांनी अंदाजे 50 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पुणे : वाघोली पोलिसांनी शहरातील बांधकाम व्यावसायिक...

नसरापूर बलात्कार-हत्येचा खटला अंतिम टप्प्यात, फिर्यादी पक्षाने अंतिम साक्षीदार तपासले | पुणे बातम्या

0
पुणे : नसरापूर बलात्कार आणि खून खटल्यातील खटला मंगळवारी विशेष पोक्सो न्यायालयासमोर अंतिम साक्षीदारांची तपासणी केल्याने निकालाच्या जवळ गेला.कोर्टाने फिर्यादी साक्षीदार (पीडब्ल्यू)...

Translate »
error: Content is protected !!