Homeताज्या बातम्यामेदनकरवाडीत श्री खंडोबा देवस्थानात रथसप्तमी उत्साहात साजरी

मेदनकरवाडीत श्री खंडोबा देवस्थानात रथसप्तमी उत्साहात साजरी

रथसप्तमी उत्साहात साजरी
मेदनकरवाडीत रथसप्तमी परंपरेने व भक्तिभावात साजरी
आळंदी (रविदास कदम); मेदनकरवाडी येथील श्री खंडोबा देवस्थानमध्ये रथसप्तमी निमित्त पारंपरिक धार्मिक विधी, पूजा-अर्चा व विविध कार्यक्रमांच्या आयोजनासह रथसप्तमी उत्साहात साजरी करण्यात आली. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रथसप्तमीच्या निमित्ताने श्री खंडोबा महाराजांचा पुष्पसजावटीने सजवलेला वैभवी मानाचा गाडा विधीवत पूजन करून भंडारा वाहण्यात आला.
पहाटे पाच वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत श्रींची पूजा-अर्चा, आरती व देवाच्या पदांचे गायन सुरू होते. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. शिस्तबद्ध रांगेत हजारो भाविकांनी श्री खंडोबा महाराजांचे तसेच मानाच्या गाड्याचे दर्शन घेतले.
मेदनकरवाडीतील श्री खंडोबा महाराजांचे सेवेकरी म्हणून चऱ्होली, कुरूळी व चाकण परिसरातून मानकरी उपस्थित राहतात. राज्यभरातून भाविक नवसासाठी येथे येत असून “नवसाला पावणारा देव” अशी श्रींची ख्याती आहे.
मंदिराचे सेवेकरी अरुण तोडकर व ग्रामस्थांच्या सहभागातून रथसप्तमी ते माघ पौर्णिमा या कालावधीत परंपरेनुसार नित्यपूजा केली जाते. रथसप्तमीच्या दिवशी पूजा व आरतीनंतर भाविकांना अन्नदान महाप्रसाद वाटप करण्यात आले. तसेच रथसप्तमी ते माघ पौर्णिमा या नऊ दिवसांत मानाच्या गाड्याला पाणी घालण्याची परंपरा भक्तिभावाने पाळली जाते.
रथसप्तमी निमित्त मंदिरासमोर बैलगाडा पूजन करण्यात आले. मेदनकरवाडीतील श्री खंडोबा देवस्थान हे राज्यात परिचित व प्रसिद्ध श्रीक्षेत्र असून, या पवित्र दिवशी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रथा-परंपरांचे पालन करत श्रींचे दर्शन घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

महा मेट्रो, पीएमपीएमएल शहरभर अखंड ट्रेन-बस प्रवासासाठी ‘एक प्रवास, एक तिकीट’ प्रणाली शोधत आहे

0
एकात्मिक तिकीट व्यतिरिक्त, महा मेट्रो आणि पीएमपीएमएल फीडर कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर देखील भर देत आहेत पुणे : महा मेट्रो आणि पीएमपीएमएल ट्रेन आणि...

विश्रांतवाडी रोडवरील बीआरटीएस लेन पाडण्यास पीएमसीच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे

0
PMC स्थायी समितीने विश्रांतवाडी रोडवरील 4.5 किमी समर्पित बस कॉरिडॉर हटविण्यास मंजुरी दिली आहे. पुणे : बीआरटीएस लेन पाडण्याच्या प्रलंबित निर्णयाने अखेर अंतिम...

पुण्याच्या बागायतदारांनी विदेशी फळे आणि औषधी वनस्पती घेतल्याने टेरेस उष्णकटिबंधीय बनतात

0
शहरातील घराच्या बागेतून एवोकॅडोची नवीन कापणी पुणे : पुण्यातील गृह बागायतदारांची वाढती संख्या टेरेस, बाल्कनी आणि घरामागील अंगणांचे रूपांतर मिनी फार्ममध्ये करत आहेत,...

राम मंदिरातील दानरकमेची चोरी उघड; कर्मचाऱ्याच्या घरातून ₹१० लाखांची रोकड जप्त

0
पुणे /प्रतिनिधी रोहिदास कदम मिळालेल्या माहिती अनुषंगाने अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत मंदिरातील एका कर्मचाऱ्याच्या घरातून सुमारे ₹१० लाखांची...

Translate »
error: Content is protected !!