पुणे प्रतिनिधी (अशोक कुंभार ) आज दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी
पुण्यातील एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग येथे
विश्वनाथ स्पोर्ट्स मीट २०२६ या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा महोत्सवाचा
दिमाखदार शुभारंभ झाला आहे.
या क्रीडा महोत्सवांतर्गत आजपासून
क्रिकेट स्पर्धेला अधिकृत सुरुवात झाली असून
देशभरातील १२ नामांकित विद्यापीठांचे संघ
या स्पर्धेत आपले कौशल्य सादर करत आहेत.
अत्याधुनिक क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत
उच्च दर्जाचा खेळ, शिस्तबद्ध आयोजन
आणि खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
विजेता व उपविजेता संघासाठी ट्रॉफी मानधन रोखरुपयांची बक्षिसे
ठेवण्यात आली असून
ही स्पर्धा युवक खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर
आपली ओळख निर्माण करून देणारे व्यासपीठ ठरणार आहे.
विद्यापीठ प्रशासनाकडून
खेळाडूंसाठी उत्तम सुविधा, निवास व सुरक्षिततेची
पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे.
पुण्यातील एमआयटी एडीटी विद्यापीठात
विश्वनाथ स्पोर्ट्स मीट २०२६ मुळे
संपूर्ण परिसर क्रीडामय वातावरणाने भारावून गेला आहे. 5000 खेळाडूंचा सहभाग असणार आहे

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























