आळंदीत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज रथोत्सव हरिनाम गजरात उत्साहात
आळंदी (प्रतिनिधी रविदास कदम)
आळंदी नगरीत श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या वार्षिकोत्सवानिमित्त भव्य रथोत्सव हरिनाम गजरात व भक्तिभावाच्या वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला. “श्री विठ्ठल, श्री विठ्ठल” नामजयघोषात भाविकांनी श्रींचा रथ स्वतः हाताने ओढत रथोत्सवात सेवा रुजू केली.
श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मठ येथून रथोत्सव नगरप्रदक्षिणेस प्रारंभ झाला. मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या, आकर्षक विद्युत रोषणाई, पुष्पवर्षाव व फटाक्यांची आतषबाजी यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्रींच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त मुक्तद्वार अन्नसंतर्पण महाप्रसादासही भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
नगरप्रदक्षिणा मार्गावरील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन आळंदी पोलीस स्टेशन व वाहतूक पोलीस विभागाने उत्कृष्ट नियोजन व चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे, भीमा घुंडरे, पोलीस मित्र योगेश जाधव आदींसह आळंदी ग्रामस्थांनी रथोत्सवात सेवा दिली.
रथोत्सवात ग्रामस्थ मानकरी रानवडे परिवार यांनी परंपरेनुसार नगारखाना सेवा बजावत नगरप्रदक्षिणेत विशेष योगदान दिले. श्रींचे पुजारी सुधीर गांधी, सुरेश गांधी, गजानन गांधी व गांधी परिवार, तसेच अवधूत महाराज चक्रांकित परिवार यांनी श्रींच्या मूळपीठावर रथोत्सवाचे पारंपरिक स्वागत केले.
नगरप्रदक्षिणा मार्गावर स्वामी भक्तांनी पुष्पहार, प्रसाद अर्पण करून श्रींचे स्वागत केले. आळंदी देवस्थान व आवेकर भावे रामचंद्र संस्थानतर्फेही रथोत्सवाचे स्वागत करण्यात आले. संस्थानचे विश्वस्त अर्जुन मेदनकर यांनी संस्थानच्या वतीने स्वागत केले.
रथोत्सव हजेरी मारुती मंदिर, मरकळ चौक, पाण्याची टाकी, कॉसमॉस बँक, आळंदी पोलीस स्टेशन, नगरपरिषद चौक, महाद्वार चौक मार्गे मठात दाखल झाला. माऊली मंदिरासमोर श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या वतीने श्रींची पूजा, आरती व प्रसाद वितरण करण्यात आले. यावेळी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, देवस्थान व्यवस्थापक माऊली वीर, श्रीधर सरनाईक, चोपदार सेवक, मानकरी व पदाधिकारी उपस्थित होते.
श्री विठ्ठल नामजयघोषात ग्रामस्थ व भाविकांनी श्रींचा रथ ओढत रथोत्सवात सहभाग घेतला. रथोत्सवात संस्थान मठाचे पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष सुरेश गांधी परिवार, सेवक, वारकरी, भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंपरेनुसार श्रीपूजा, धार्मिक विधी व सेवा सुरेश गांधी परिवाराकडून नित्यनेमाने पार पाडण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे

0
महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे कोल्हापूर : म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास १४...

इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

0
पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या...

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

महा मेट्रो, पीएमपीएमएल शहरभर अखंड ट्रेन-बस प्रवासासाठी ‘एक प्रवास, एक तिकीट’ प्रणाली शोधत आहे

0
एकात्मिक तिकीट व्यतिरिक्त, महा मेट्रो आणि पीएमपीएमएल फीडर कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर देखील भर देत आहेत पुणे : महा मेट्रो आणि पीएमपीएमएल ट्रेन आणि...

Translate »
error: Content is protected !!