पुरंदर | प्रतिनिधी अशोक कुंभार :
राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या पुरंदर तालुका अध्यक्षपदी चर्मकार समाजाचे युवा व सक्रिय नेते मंगेश गायकवाड यांची बिनविरोध निवड मंगळवार, दि. 30 डिसेंबर 2025 रोजी पार पडली. ही निवड राष्ट्रीय उपाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य निरीक्षक शशिकांत सोनवणे, सुदाम लोखंडे व भारतीताई गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
यावेळी मा. अध्यक्ष (पुरंदर तालुका) गुलाब गायकवाड, जिल्हाध्यक्ष गोरख सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष उत्तम आगवणे, भाजपा नेते बाळासाहेब भोसले, मा. जिल्हा युवक अध्यक्ष ईश्वर लोखंडे, पुणे शहर उपाध्यक्ष दत्तात्रय आबनावे, आडसुळ साहेब, सूर्यकांत भोसले, अमोल कांबळे, जगदीश दळवी, रघुनाथ ठवाळ, संतोष आबनावे, सूर्यकांत कांबळे, गणेश भोसले, संतोष पोटे, सागर बागडे, संदीप भोसले, विश्वनाथ गायकवाड, योगेश गद्रे, राजू देसाई, महिला अध्यक्षा प्रियंका भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजकार्याची दखल
शशिकांत सोनवणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मंगेश गायकवाड हे गेल्या १५ वर्षांपासून पुरंदर तालुका व पुणे जिल्ह्यात समाजकार्य करत असून संत रविदास जयंती, वधू–वर परिचय मेळावे, विविध गावांतील शाखा उद्घाटन, तसेच अनेक ठिकाणी संत रविदास सभागृह उभारणीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे.
पुढील कार्याचा संकल्प
निवडीनंतर बोलताना मंगेश गायकवाड म्हणाले की, “आदरणीय गुलाबतात्या गायकवाड व उद्योजक उत्तम आगवणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत काम केले असून पुढेही सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. चर्मकार समाजातील अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवू. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, संत रविदास महामंडळ व समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांचे कार्यक्रम तालुक्यात आयोजित करू.”
शुभेच्छांचा वर्षाव
संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री बबनराव घोलप यांनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या. तसेच मा. आमदार संजय जगताप, नगरसेवक विजय वढणे, नगरसेवक प्रदीप राऊत, उद्योजक सुभाषुअण्णा सूर्यवंशी, नगरसेवक अजित जगताप, आठरा पगड बारा बलुतेदार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब भांडवलकर, मातंग समाजाचे नेते महादेव भोंडे, राजेंद्र धोत्रे, गुरव समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दिलीप बापू गुरव यांनी समक्ष भेटून अभिनंदन केले.
पुरंदर तालुक्यातील विविध गावांतील समाजबांधवांनी प्रत्यक्ष भेटून मंगेश गायकवाड यांचे अभिनंदन केले.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























