Homeताज्या बातम्यायुरिया खताचा काळाबाजार; शासनदर ₹266 असताना ₹500 पर्यंत विक्री — शेतकऱ्यांचा संताप,...

युरिया खताचा काळाबाजार; शासनदर ₹266 असताना ₹500 पर्यंत विक्री — शेतकऱ्यांचा संताप, आमरण उपोषणाचा इशारा

भोकरदन (जि. जालना) | प्रतिनिधी गजानन राजबिंडे पाटील
भोकरदन तालुक्यातील मोढेकर शहर व परिसरात युरिया खताचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. शासनाने निश्चित केलेल्या ₹266 प्रति बॅग दराऐवजी ₹400 ते ₹500 दराने युरिया विक्री होत असल्याने शेतकरी वर्ग प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे.
या प्रकरणी सुरज पांडुरंग रोडे (रा. जैनपुर कोठारा, ता. भोकरदन) यांनी जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, काही कृषी सेवा केंद्र चालक व संबंधित अधिकारी–कर्मचारी यांच्या आर्थिक संगनमतामुळेच हा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी योग्य दरात खत मागितल्यास त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असून, गरज असताना खत नाकारले जात असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामात पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
तक्रार अर्जात पुढे नमूद करण्यात आले आहे की, सात दिवसांच्या आत प्रशासनाने ठोस कारवाई न केल्यास 5 जानेवारी 2026 रोजी पंचायत समिती भोकरदन येथे आमरण उपोषण करण्यात येईल. याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
या तक्रारीची प्रत विभागीय आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक तसेच स्थानिक दैनिकांना पाठवण्यात आली आहे.
दरम्यान, युरिया खताच्या काळाबाजारावर प्रशासन नेमकी कोणती कारवाई करणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अधिक मास महोत्सवात भक्ती, ज्ञान आणि हरिनामाचा संगम; भाविकांना अध्यात्मिक मेजवानी रंगनाथ महाराज परभणीकर...

0
आळंदी (प्रतिनिधी रोहिदास कदम)पवित्र अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेला अधिक मास महोत्सव ब्र. भू. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी व ब्र. भू. गुरुवर्य श्री किसन...

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे

0
महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे कोल्हापूर : म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास १४...

इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

0
पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या...

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

Translate »
error: Content is protected !!