Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र कृषी दिनानिमित्त कुदळेवाडीत जंत निर्मूलन शिबिर उत्साहात; १५० जनावरांना औषधांचे वाटप

महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त कुदळेवाडीत जंत निर्मूलन शिबिर उत्साहात; १५० जनावरांना औषधांचे वाटप

पुरंदर सासवड| प्रतिनिधी अशोक कुंभार
महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून “डॉक्टर आपल्या दारी” या शासनाच्या उपक्रमांतर्गत पशुवैद्यकीय चिकित्सालय, जेजुरी यांच्या वतीने ग्रामपंचायत कोळविहिरे हद्दीतील कुदळेवाडी येथे जंत निर्मूलन शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील पशुधनाचे आरोग्य सुदृढ ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराला पशुपालक, गोपालक व दुग्ध व्यवसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिरादरम्यान जनावरांच्या आरोग्याची तपासणी करून जंतनाशक औषधांचे वाटप करण्यात आले. तसेच प्राथमिक उपचारासाठी आवश्यक औषधे व गोळ्यांचेही वितरण करण्यात आले. या उपक्रमातून एकूण १५० जनावरांना जंत निर्मूलनासाठी औषधांचा लाभ देण्यात आला.
यावेळी उपस्थित पशुपालकांना शासनाच्या “मुख्यमंत्री ग्रामीण उद्योजकता” योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. योजनेची माहितीपत्रके वाटप करून विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही करण्यात आले.
या प्रसंगी कोळविहिरे गावचे माजी सरपंच व डेअरीचे चेअरमन सचिन कुदळे, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. भूषण लोखंडे (पशु चिकित्सालय, जेजुरी), आदर्श गोपालक मेजर विठ्ठल झगडे, रवी टेकवडे, महेश कुदळे, सागर कुदळे, ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच परिसरातील अनेक गोपालक, पशुपालक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागातील पशुधनाचे आरोग्य जपण्यासाठी अशा प्रकारच्या जंत निर्मूलन शिबिरांची आवश्यकता असून, भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविण्यात यावेत, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे कचरा प्रकल्पावर कचऱ्याचे डोंगर कोसळल्याने 7 अजूनही अडकले, 9 बाहेर काढले

0
अधिका-यांनी सांगितले की, रविवारपासून या भागात झालेल्या मुसळधार आणि अविरत पावसामुळे PCMC च्या वेस्ट-टू-एनर्जी प्लांट इमारतीवर कचऱ्याचा मोठा ढिगारा कोसळला असावा. पुणे :...

थोरल्या पादुका मंदिरात माऊलींच्या पालखी सोहळ्याचे भक्तिमय स्वागत; हरिनामाच्या गजरात महापूजा संपन्न

0
आळंदी : (संपादक रोहिदास कदम)आषाढी पायी वारीच्या पावन सोहळ्यानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वैभवी पालखी सोहळ्याचे आळंदी-पुणे मार्गावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज...

बीएलओ ड्युटीवरून महा शिक्षकांनी आज राज्यव्यापी शाळा बंद

0
शिक्षणाच्या गुणवत्तेशी तडजोड होऊ नये म्हणून शिक्षकांना केवळ शैक्षणिक जबाबदाऱ्या सोपवल्या जाव्यात अशी संघटनांची इच्छा आहे. पुणे : प्राथमिक शिक्षकांना बूथ-लेव्हल ऑफिसर (बीएलओ)...

पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; पाणी साचले, वाहतूक कोंडी शहर ठप्प; पूरग्रस्त भागातून ४९२ कुटुंबांचे...

0
मुसळधार पावसामुळे पुण्यात पाणी साचले आणि वाहतूक विस्कळीत झाली. पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) मान्सूनपूर्व तयारीमधील उणिवा उघड करत, मोठ्या प्रमाणावर पाणी साचणे, वाहतूक...

शेतकरी कर्जमाफीबाबत सरकार गंभीर नाही, विरोधाचा इशारा

0
एमपीसीसी प्रमुख हर्षवर्धन सपकाळ पुणे : एमव्हीए सदस्य आणि शेतकरी कार्यकर्त्यांनी शेततळ्यांच्या दुर्दशेवर राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला. शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत दिरंगाई करून...

Translate »
error: Content is protected !!