Homeताज्या बातम्यापुरावा नसतानाही खुनाचा छडा; सासवड पोलिसांचा ‘पुरोगामी संघर्ष परिषद’तर्फे गौरव

पुरावा नसतानाही खुनाचा छडा; सासवड पोलिसांचा ‘पुरोगामी संघर्ष परिषद’तर्फे गौरव

सासवड (प्रतिनिधी.अशोक कुंभार)
कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसतानाही सासवड येथील राजू दत्तात्रय बोराडे यांच्या खुनाचा अवघ्या काही दिवसांत छडा लावून आरोपींना अटक करणाऱ्या सासवड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा ‘पुरोगामी संघर्ष परिषदे’च्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. पोलिसांच्या या उल्लेखनीय व तत्पर कामगिरीमुळे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली असून नागरिकांकडून या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
९ डिसेंबर २०२५ रोजी सासवड परिसरात एक अज्ञात मृतदेह आढळून आला होता. तपासाअंती हा मृतदेह महाडा कॉलनी, सासवड येथील राजू दत्तात्रय बोराडे (वय ३८) यांचा असल्याचे स्पष्ट झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सासवड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा, पुणे यांनी तातडीने तपास सुरू केला.
तपासादरम्यान पैशांच्या वादातून सुरज प्रकाश बलराम निषाद (वय ३४, रा. छत्तीसगड) व नीरज ओम प्रकाश गोस्वामी (वय २५, रा. मध्य प्रदेश) यांनी बोराडे यांना दारू पाजून निर्जनस्थळी नेले व त्यांच्याच चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. कोणताही ठोस पुरावा नसतानाही पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती व कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे दोन्ही आरोपींना अटक करून गुन्ह्याची कबुली मिळवली.
पोलीस पथकाचा जाहीर सत्कार
या यशस्वी मोहिमेबद्दल सामाजिक बांधिलकी जपत ‘पुरोगामी संघर्ष परिषदे’च्या वतीने सासवड पोलीस स्टेशन येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा हार, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या वेळी पुढील अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला:
पोलीस निरीक्षक कुमार रामचंद्र कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चोरगे, परमेश्वर गोडसे, सुरज नांगरे, पोलीस हवालदार जब्बार सय्यद, सुहास लाटणे, गोकुळ सिरपकर, पोलीस नाईक अक्षय पिल्ले, तसेच पोलीस अंमलदार प्रणय मखरे व इतर कर्मचारी.
मान्यवरांची उपस्थिती
सत्कार समारंभास ‘पुरोगामी संघर्ष परिषदे’चे युवक प्रदेशाध्यक्ष मनोजदादा भिसे, महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख भानुदास भिसे, पश्चिम महाराष्ट्र सल्लागार समिती अध्यक्ष प्राचार्य पंढरीनाथ आढाळगे, सासवड शहराध्यक्ष सचिन भोंडे, पुणे जिल्हाध्यक्ष (वरिष्ठ) गोकुळ भिसे, महिला आघाडी पुरंदर तालुका अध्यक्षा रोहिणीताई कुंभार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष निखिल आढाळगे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच लालासो आवळे, किशोर आढाळगे, राजू भोंडे, किसन भिसे, शरद चव्हाण, शंकर लोणकर, लक्ष्मण अण्णा पवार आदी प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.
या वेळी उपस्थितांनी पोलिसांच्या धाडसी, प्रामाणिक व समाजहितासाठीच्या कार्याचे विशेष कौतुक केले.https://youtu.be/GdHIwQktTpw

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अधिक मास महोत्सवात भक्ती, ज्ञान आणि हरिनामाचा संगम; भाविकांना अध्यात्मिक मेजवानी रंगनाथ महाराज परभणीकर...

0
आळंदी (प्रतिनिधी रोहिदास कदम)पवित्र अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेला अधिक मास महोत्सव ब्र. भू. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी व ब्र. भू. गुरुवर्य श्री किसन...

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे

0
महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे कोल्हापूर : म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास १४...

इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

0
पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या...

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

Translate »
error: Content is protected !!