Homeताज्या बातम्यापुण्यातील एमआयटी-एडीटीचे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत वर्चस्व

पुण्यातील एमआयटी-एडीटीचे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत वर्चस्व

विश्वनाथ स्पोर्ट मीट–२०२६
‘एमआयटी-एडीटी’ विद्यापीठाने राखले विजेतेपद
बी.के. बिर्ला रात्र महाविद्यालय दुसरे, एम.ई.एस. गरवारे महाविद्यालय तिसऱ्या क्रमांकावर
पुणे प्रतिनिधी अशोक कुंभार ):आठव्या विश्वनाथ स्पोर्ट मीट (व्हीएसएम–२०२६) या देशातील सर्वांत मोठ्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन व आंतरविद्यापीठीय क्रीडा स्पर्धेत यजमान एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एमआयटी-एडीटी), विश्वराजबाग, पुणे यांच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत स्पर्धेचे विजेतेपद कायम राखले. एमआयटी-एडीटीने तब्बल १० सुवर्ण व २४ रौप्य पदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थान पटकाविले.
मुंबईच्या बी.के. बिर्ला रात्र महाविद्यालयाने ५ सुवर्ण व ४ रौप्य पदकांसह दुसरा क्रमांक, तर एम.ई.एस. गरवारे महाविद्यालय, पुणे यांनी ५ सुवर्ण व ३ रौप्य पदकांसह तिसरा क्रमांक मिळविला. एमआयटी-एडीटी विद्यापीठाने गतवर्षीही विजेतेपद पटकाविले होते.
भारत सरकारच्या फिट इंडिया चळवळीच्या प्रचारासाठी क्रीडा भारती व बँक ऑफ इंडिया यांच्या प्रमुख सहकार्याने ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.
१५ क्रीडा प्रकार, ६,००० हून अधिक खेळाडू
या स्पर्धेत १५ क्रीडा प्रकारांमध्ये, देशभरातील १५० हून अधिक शिक्षण संस्थांमधील ६,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. बक्षीस वितरण सोहळा पद्मश्री व अर्जुन पुरस्कारप्राप्त रोईंगपटू कॅप्टन बजरंग लाल ताखर (व्हीएसएम), ऑलिम्पियन व अर्जुन पुरस्कार विजेते जलतरणपटू विरधवल खाडे, मेजर ध्यानचंद पुरस्कारप्राप्त रोवर स्मिता शिरोळे-यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व प्र-कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुराज भोयार व क्रीडा संचालक प्रा. पद्माकर फड उपस्थित होते. विजेत्यांना १० लाख रुपयांपर्यंतची रोख पारितोषिके, पदके व करंडक प्रदान करण्यात आले.
विविध क्रीडा प्रकारांतील निकाल (संक्षेप)
बॅडमिंटन :
पुरुष – डी.वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ (एमआयटी-एडीटीवर ३–२ विजय)
महिला – विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (२–१ विजय)
बुद्धिबळ :
पुरुष व महिला – एमआयटी विश्वशांती विद्यापीठ
बास्केटबॉल :
पुरुष – एमआयटी-एडीटी विद्यापीठ
महिला – एमआयटी विश्वशांती विद्यापीठ
फुटबॉल :
पुरुष – स्पायसर विद्यापीठ
महिला – एमआयटी-एडीटी विद्यापीठ
(अंजली कामठे – सर्वोत्तम खेळाडू)
कबड्डी :
पुरुष – भारती विद्यापीठ
महिला – सरहद महाविद्यालय
(विश्वजीत सरवले, ज्ञानेश्वर खळदकर – सर्वोत्तम खेळाडू)
खो-खो :
महिला – एम.ई.एस. गरवारे महाविद्यालय
पुरुष – एमआयटी-एडीटी विद्यापीठ
(श्वेता नवले, निखिल परांदे – सर्वोत्तम खेळाडू)
क्रिकेट :
पुरुष – भारती विद्यापीठ
महिला – अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ
भारती विद्यापीठाकडे क्रिकेट करंडक
अंतिम सामन्यात भारती विद्यापीठाने निकमार विद्यापीठाचा ७४ धावांनी पराभव केला. ओम खटावकर याने ५४ चेंडूत नाबाद ९२ धावांची खेळी करत सामनावीर ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महा मेट्रो, पीएमपीएमएल शहरभर अखंड ट्रेन-बस प्रवासासाठी ‘एक प्रवास, एक तिकीट’ प्रणाली शोधत आहे

0
एकात्मिक तिकीट व्यतिरिक्त, महा मेट्रो आणि पीएमपीएमएल फीडर कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर देखील भर देत आहेत पुणे : महा मेट्रो आणि पीएमपीएमएल ट्रेन आणि...

विश्रांतवाडी रोडवरील बीआरटीएस लेन पाडण्यास पीएमसीच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे

0
PMC स्थायी समितीने विश्रांतवाडी रोडवरील 4.5 किमी समर्पित बस कॉरिडॉर हटविण्यास मंजुरी दिली आहे. पुणे : बीआरटीएस लेन पाडण्याच्या प्रलंबित निर्णयाने अखेर अंतिम...

पुण्याच्या बागायतदारांनी विदेशी फळे आणि औषधी वनस्पती घेतल्याने टेरेस उष्णकटिबंधीय बनतात

0
शहरातील घराच्या बागेतून एवोकॅडोची नवीन कापणी पुणे : पुण्यातील गृह बागायतदारांची वाढती संख्या टेरेस, बाल्कनी आणि घरामागील अंगणांचे रूपांतर मिनी फार्ममध्ये करत आहेत,...

राम मंदिरातील दानरकमेची चोरी उघड; कर्मचाऱ्याच्या घरातून ₹१० लाखांची रोकड जप्त

0
पुणे /प्रतिनिधी रोहिदास कदम मिळालेल्या माहिती अनुषंगाने अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत मंदिरातील एका कर्मचाऱ्याच्या घरातून सुमारे ₹१० लाखांची...

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

0
चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

Translate »
error: Content is protected !!