Homeताज्या बातम्याधर्मशाळा वाद चिघळण्याची चिन्हे; समाजात तीव्र नाराजी

धर्मशाळा वाद चिघळण्याची चिन्हे; समाजात तीव्र नाराजी

आळंदी देवाची प्रतिनिधी रोहिदास कदम
आळंदी : समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा आळंदी येथे सुरू असलेल्या वादाने आता गंभीर स्वरूप धारण केले असून समाजामध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. धर्मशाळेच्या जागेवर ताबा मिळवण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून काही व्यक्तींमार्फत दादागिरी, धमकावणे आणि खोट्या तक्रारींचा वापर केला जात असल्याचा आरोप समाज बांधव आणि माजी-विद्यमान विश्वस्तांनी केला आहे.
समाज बांधवांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मशाळेच्या कारभारात पारदर्शकता नसल्याचा आरोप करत अनेक विश्वस्त आणि पदाधिकाऱ्यांनी खर्चाचा हिशोब मागितला असता त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. काहींवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, तर काहींना मारहाण झाल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त कार्यालयात खोटे अर्ज देऊन समाजातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करण्यात आला.
तसेच, धर्मशाळेच्या अधिकृत निवडणुकीत निवडून आलेल्या कार्यकर्त्यांचे बोर्ड हटवण्यात आल्याने वाद आणखी टोकाला गेल्याचे सांगण्यात आले. या सर्व प्रकारामागे बाबा कांबळे यांचे नाव घेत गंभीर आरोप करण्यात आले असून, धर्मशाळेतील खर्च व निर्णय प्रक्रिया एकहाती चालवली जात असल्याचा आरोप समाजबांधवांनी केला आहे.
“धर्मशाळा ही संपूर्ण समाजाची मालमत्ता आहे, कोणाची खाजगी संपत्ती नाही,” अशी भावना व्यक्त करत समाजातील ज्येष्ठांनी सर्वांनी एकत्र येऊन या विषयावर गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त केली. पुजारी म्हणून जबाबदारी पार पाडावी, मात्र समाजाच्या मालकीवर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करू नये, असेही काही समाजबांधवांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विश्वस्तांवर झालेल्या कथित मारहाणीच्या घटनांवरूनही संताप व्यक्त करण्यात आला. काही प्रकरणांमध्ये तडजोडीसाठी पैशांची मागणी झाल्याचेही आरोप समोर आले आहेत. या सर्व घटनांमुळे समाजात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
समाजातील अनेक पदाधिकारी आणि बांधवांनी आता या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पेठ भागातील 6,500 ग्राहकांना वीजपुरवठा खंडित झाला पुणे बातम्या

0
महावितरणचे कर्मचारी दुरुस्तीचे काम करतातमहावितरणचे कर्मचारी दुरुस्तीचे काम करतातमहावितरणचे कर्मचारी दुरुस्तीचे काम करतातमहावितरणचे कर्मचारी दुरुस्तीचे काम करतातमहावितरणचे कर्मचारी दुरुस्तीचे काम करतात पुणे :...

तोंडाच्या कर्करोगात 2021 पासून झपाट्याने वाढ झाली आहे, केवळ 2 महिन्यांत 250 प्रकरणे

0
पुणे : केवळ एप्रिल आणि मे महिन्यात महाराष्ट्रात 250 पुष्टी झालेल्या प्रकरणांसह स्क्रीनिंगमध्ये वाढ झाल्याने तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत तीव्र आणि चिंताजनक...

पुणे विषारी दारू प्रकरण : भिवंडीत FDA ची धडक कारवाई, मेथेनॉल साठा जप्त

0
मानव मित्र न्यूज |मुंबई प्रतिनिधी पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात घडलेल्या विषारी दारू दुर्घटनेनंतर राज्यातील यंत्रणा सतर्क झाली असून या प्रकरणाचे धागेदोरे आता ठाणे जिल्ह्यातील भिवंडीपर्यंत...

सरकारच्या जोरावर जिल्ह्यात एप्रिल आणि मे मध्ये 25 हजार पाइप्ड गॅस कनेक्शन्स आहेत

0
पुणे : एलपीजी सिलिंडरची वाढती मागणी आणि किमतीत वाढ आणि पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या दरम्यान काही टंचाई, पीएनजी निवडण्यासाठी सरकारचा दबाव...

श्योक, लडाख ते पुण्यापर्यंतची सीमावर्ती प्रेमकथा

0
पुणे : पर्वत नुसती पार्श्वभूमी बनत नाहीत तर श्योक नाटकाचे साक्षीदार बनतात. नद्या काय सीमा पुसतात ते लक्षात ठेवतात आणि रेडिओ गाणी लोक कधीही...

Translate »
error: Content is protected !!