पुरंदर सासवड( प्रतिनिधी अशोक कुंभार ) देशाला नवे CDS; लेफ्टनंट जनरल एन.एस. राजा सुब्रमणी यांच्याकडे मोठी जबाबदारी
भारत सरकारने देशाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी महत्त्वाचा निर्णय घेत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) एन.एस. राजा सुब्रमणी यांची पुढील ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ (CDS) म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. विद्यमान CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ ३० मे २०२६ रोजी संपल्यानंतर राजा सुब्रमणी अधिकृतपणे पदभार स्वीकारणार आहेत.
सध्या ते नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत असून यापूर्वी त्यांनी भारतीय लष्कराचे उपप्रमुख (Vice Chief of Army Staff) म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे देशाच्या संरक्षण व्यवस्थेला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मोदी सरकारच्या या निर्णयामुळे संरक्षण क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली असून तिन्ही सैन्य दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी राजा सुब्रमणी यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरणार आहे. अनुभवी, शिस्तप्रिय आणि रणनीतीत पारंगत अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला अधिक सक्षम करण्यासाठी आणि आधुनिक संरक्षण धोरणांना गती देण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. संरक्षण वर्तुळातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 🇮🇳

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























