Homeताज्या बातम्याथोरल्या पादुका मंदिरात अधिक मासानिमित्त भव्य त्रिदिनी सप्ताहाचे आयोजन

थोरल्या पादुका मंदिरात अधिक मासानिमित्त भव्य त्रिदिनी सप्ताहाचे आयोजन

आळंदी | प्रतिनिधी.माऊली घुंडरे
आळंदी येथील वडमुखवाडी परिसरातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने अधिक मासानिमित्त भव्य दिव्य त्रिदिनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांनी दिली.
या धार्मिक मंगलमय अधिक मास पर्वणीत दररोज सकाळी काकडा, भजन, दुपारी महिला भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी हरिपाठ तसेच रात्री हरिकीर्तन सेवा आयोजित करण्यात आली आहे. कीर्तनानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार असून रात्री १० ते १२ या वेळेत जागर कार्यक्रमही होणार आहे.
या सप्ताहाचा शुभारंभ गुरुवार, ११ जून रोजी होणार असून रविवारी, १४ जून रोजी हरिनाम गजरात सांगता होईल. या धार्मिक पर्वणीचे आयोजन श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्ट, थोरल्या पादुका तरुण भजनी मंडळ आणि स्वकाम सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
सप्ताहादरम्यान दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ह.भ.प. भागवत महाराज कचरे (पहिला दिवस), ह.भ.प. मल्लेश महाराज चिंतले (दुसरा दिवस) आणि ह.भ.प. सोपान महाराज शिंदे (तिसरा दिवस) यांची कीर्तन सेवा होणार आहे. तसेच रविवारी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. महेंद्र महाराज नलावडे यांचे काल्याचे कीर्तन होणार असून हरिनाम गजर व महाप्रसाद वाटपाने सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे.
अधिक मासाच्या या पुण्य पर्वकाळातील धार्मिक उत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ॲड. विष्णू तापकीर यांनी केले आहे.
— मानव मित्र न्यूजचं माऊली घुंडरे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्रात मराठी तरुणांना नोकरी नाकारण्याची हिंमत कुणाची?

0
आळंदी.देवाची,(प्रतिनिधी रविदास कदम,) ) महाराष्ट्रात मराठी तरुणांना नोकरी नाकारण्याची हिंमत कुणाची? रोजगाराच्या नावाखाली भाषिक भेदभाव; मराठी अस्मितेवर घाला महाराष्ट्रात राहायचे, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा, महाराष्ट्राच्या बाजारपेठेतून कोट्यवधींची...

पुण्याच्या पुरंदर विमानतळाच्या जमिनीसाठी ७०% संमती, मुदतवाढीचा निर्णय प्रलंबित

0
पुणे : प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन संमती प्रक्रिया 70% पर्यंत पोहोचली आहे, प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या एकूण 1,285 हेक्टरपैकी सुमारे 851 हेक्टरसाठी...

नसरापूर खटला निर्णायक टप्प्यात; 48 साक्षीदार तपासण्यात आल्याचे सरकारी वकिलांचे म्हणणे आहे

0
आजपर्यंत एकूण 48 साक्षीदार तपासण्यात आले पुणे: नसरापूर बलात्कार आणि खून खटल्यातील खटला निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, आतापर्यंत 48 फिर्यादी साक्षीदार तपासले गेले...

आळंदी नगरपरिषदेकडून पर्यावरणाचा खेळखंडोबा? कचरा डेपोमध्ये सर्रास कचरा जाळण्याचा प्रकार!

0
आळंदी (रवी कदम) : संतांची नगरी आळंदीमध्ये कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून आळंदी नगरपरिषदेच्या कचरा डेपोमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया प्रभावीपणे राबविली जात...

हिडमा मडावी गाण्यावर नृत्य प्रकरण; दोन विद्यार्थ्यांना अटकपूर्व जामीन

0
पुणे | मानव मित्र न्यूज रविदास कदम विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दोन विद्यार्थ्यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. आर. शेट्टी यांच्या न्यायालयाने अटी-शर्तींसह अटकपूर्व...

Translate »
error: Content is protected !!