Homeताज्या बातम्यागरीब कष्टकरी दिव्यांगांसाठी सुवर्णसंधी! माणगावमध्ये मोफत कृत्रिम अवयव शिबिराचे आयोजन

गरीब कष्टकरी दिव्यांगांसाठी सुवर्णसंधी! माणगावमध्ये मोफत कृत्रिम अवयव शिबिराचे आयोजन

माणगाव (जि. रायगड /अशोक कुंभार प्रतिनिधी

रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो यांच्या निधीतून भारत विकास परिषद कोथरूड व दिव्यांग केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने माणगाव येथे मोफत दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रु. ५० हजारांपर्यंत किमतीचे आधुनिक कृत्रिम पाय, हात व कॅलिपर पूर्णतः मोफत देण्यात येणार आहेत.

हे शिबिर विशेषतः गरीब, गरजू व कष्टकरी दिव्यांग बांधवांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. महागड्या उपचारांअभावी आणि आर्थिक अडचणींमुळे कृत्रिम अवयव मिळू न शकलेल्या दिव्यांगांना या शिबिरामुळे पुन्हा स्वावलंबी जीवन जगण्याचा मार्ग खुला होणार आहे.

शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून योग्य मोजमापानुसार आधुनिक मॉड्युलर कृत्रिम अवयव बसवण्यात येणार असून, गरजेनुसार मार्गदर्शनही दिले जाणार आहे.

शिबिराचे ठिकाण : वनवासी कल्याण आश्रम शाळा, माणगाव.

स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व संस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत, जास्तीत जास्त गरजू दिव्यांगांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

हा उपक्रम म्हणजे केवळ मदत नव्हे, तर गरीब कष्टकरी दिव्यांगांच्या आत्मसन्मानाने जगण्याकडे टाकलेले आशेचे पाऊल असल्याची भावना व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चाकण परिषदेने कुत्र्यांची नसबंदी मोहीम सुरू केली, निवारा संख्या दुप्पट

0
पुणे : पुणे-नाशिक महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात एका महिलेचा (३२) मृत्यू झाल्याच्या घटनेला महिना उलटला तरी अशा जीवघेण्या घटना रोखण्यासाठी चाकण नगरपरिषदेने...

पुणे स्टेशनवरील कॅब रेल्वे अधिकाऱ्यांच्या रडारवर

0
(मंदारचे छायाचित्र)पुणे:पुणे स्थानक परिसरात जागा उपलब्ध असल्यास रेल्वे अधिकारी समर्पित कॅब बे असण्याची शक्यता तपासत आहेत."पुढील परिसंचरण क्षेत्रावरील जागा ही एक समस्या आहे, परंतु...

अनोख्या हेअरस्टाइलमुळे त्रिकुटासह तरुणाने विद्यार्थी आणि मित्राला लुटले

0
पुणे : अनोख्या हेअरस्टाइलमुळे 20 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण करून त्याच्या मित्रासह त्याच्या तीन साथीदारांना 14 हजार रुपये लुटणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.तळेगाव बस...

एका महिन्यात spl किशोर पोलिस युनिट्स स्थापन करा: राज्य पॅनेल

0
कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने सर्व जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांना आणि शहर आयुक्तालयांच्या पोलिस आयुक्तांना बाल न्याय कायदा, 2015 नुसार विशेष जुवेनाईल...

तज्ज्ञांनी भारतीय मुलांमध्ये ‘लीन’ फॅटी लिव्हर रोगाचा इशारा दिला आहे

0
पुणे : भारतात सार्वजनिक आरोग्यामध्ये शांत पण चिंताजनक बदल होत आहे. आज जागतिक यकृत दिनानिमित्त, हेपॅटोलॉजिस्ट्सनी चेतावणी दिली की नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD)...

Translate »
error: Content is protected !!