Homeताज्या बातम्याआळंदीत राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण; ३०० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग:

आळंदीत राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण; ३०० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग:

आळंदी)( संपादक रोहिदास कदम)
नगरपरिषद प्रशासन संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार आळंदी नगर परिषदेमार्फत फ्रूटवाले धर्मशाळा येथे छत्रपती संभाजीनगर व पुणे विभागातील नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एकदिवसीय राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रशिक्षणात दोन्ही विभागांतील विविध नगरपरिषदांमधील सुमारे ३०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सहायुक्त देवीदास टेकाडे (छत्रपती संभाजीनगर विभाग), सहायुक्त चंद्रकांत खोसे (पुणे विभाग), सहायुक्त मच्छिंद्र घोलप (पुणे जिल्हा नगरपालिका प्रशासन विभाग), आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, उपनगराध्यक्ष सुजाता तापकीर, नगरसेविका वैजयंता उमरगेकर तसेच विविध नगरपरिषदांचे अधिकारी उपस्थित होते.
ऑर्गनायझेशन फॉर डिझास्टर मॅनेजर्स (ODM) संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनोद भारद्वाज व त्यांच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांनी आपत्ती व्यवस्थापनाचे कायदेशीर स्वरूप, आपत्तीपूर्व तयारी, शोध व बचाव कार्य, आपत्कालीन प्रतिसाद, पुनर्वसन, विभागीय समन्वय, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि आपत्कालीन संप्रेषण व्यवस्था यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणादरम्यान सन २०२४ ते २०२६ या कालावधीत महाराष्ट्रातील शहरी भागांमध्ये घडलेल्या विविध आपत्तींचे विश्लेषण करण्यात आले. शहरी पूर, नदी पूर, दरडी कोसळणे, जीर्ण इमारतींचे अपघात, वृक्ष पडणे, आग, गॅस गळती, रासायनिक दुर्घटना, विद्युत अपघात, रस्ते खचणे, जलनिस्सारण व्यवस्था निकामी होणे तसेच पुरानंतर उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यात आली.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वे, स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका, नागरिकांचा सहभाग, आपत्ती जोखीम कमी करणे (Disaster Risk Reduction), हवामान बदलामुळे वाढणारी शहरी आपत्तीची तीव्रता आणि आपत्ती प्रतिरोधक (Resilient) शहरे उभारण्याच्या संकल्पनेवरही विशेष चर्चा करण्यात आली.
मान्यवरांनी आपत्ती व्यवस्थापन ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून लोकसहभागातून प्रभावीपणे राबविण्याची सामूहिक प्रक्रिया असल्याचे सांगितले. प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी कोणत्याही आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांना तात्काळ मदत, बचाव व समन्वय साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन व व्यवस्थापन आळंदी नगर परिषदेने उत्कृष्टरीत्या केले. प्रशिक्षणानंतर सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त, ज्ञानवर्धक व प्रत्यक्ष कामकाजासाठी मार्गदर्शक ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जुलैच्या पावसाने महाराष्ट्राच्या खरीप हंगामासाठी जोरदार वसुली केली; 80 टक्के पेरणी पूर्ण

0
जूनमध्ये असामान्यपणे कोरड्या पडलेल्या बदलामुळे राज्यभर शेतीच्या कामांना विलंब झाला पुणे : विदर्भ आणि मराठवाड्यात सोयाबीनची उगवण कमी झाल्याच्या तक्रारी आणि तक्रारी असूनही...

पुण्याच्या आयटी कॉरिडॉरमध्ये प्रीमियम, आरोग्य-केंद्रित टिफिन सेवांसाठी वाढती भूक दिसत आहे | पुणे बातम्या

0
पुणे : पुण्यातील आयटी कॉरिडॉरमध्ये प्रीमियम टिफिन सेवांना जोरदार मागणी दिसून येत आहे कारण कार्यरत व्यावसायिक वाढत्या प्रमाणात हेल्दी, गॉरमेट जेवणाचे पर्याय...

गोंधळात टाकणारा फरक : आरोग्य विभागाला पुण्यात डेंग्यूचे ४५२ रुग्ण; PMC फक्त 22 |...

0
पीएमसीने रुग्णालयांना त्यांचा डेटा सुधारण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत पुणे: शहरातील डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या संख्येत PMC आणि राज्य आरोग्य डेटामधील गोंधळात टाकणारा फरक दिसून...

दोन वर्षानंतरही उरुळी-फुरसुंगी टीपी स्कीमला गती मिळाली नाही | पुणे बातम्या

0
पुणे : पीएमसी हद्दीतून उरुळी-फुरसुंगीचे विलगीकरण होऊन सुमारे दोन वर्षे उलटूनही या भागांची नगररचना (टीपी) योजना रखडली आहे. पीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले TOI...

पुण्यातील मोशी एफडीएची लॅब घोषणेला एक वर्ष उलटूनही सुरूच नाही

0
सध्या अधिकाऱ्यांना मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील राज्य प्रयोगशाळांमध्ये नमुने पाठवणे भाग पडले आहे. पुणे: अन्न व औषध प्रशासन (FDA) ने पुणे...

Translate »
error: Content is protected !!