Homeताज्या बातम्याअजिंक्य डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला एन.बी.ए. मानांकन; तीन शाखांना राष्ट्रीय स्तरावरील...

अजिंक्य डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला एन.बी.ए. मानांकन; तीन शाखांना राष्ट्रीय स्तरावरील मान्यता

सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार दि. ४ लोहगाव येथील अजिंक्य डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या तीन प्रमुख अभियांत्रिकी शाखांना राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचे नॅशनल बोर्ड ऑफ अ‍ॅक्रेडिटेशन (एन.बी.ए.) मानांकन प्राप्त झाले आहे. सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या पदवी अभ्यासक्रमांना २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी तीन वर्षांची मान्यता मिळाल्याने महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात एन.बी.ए. मानांकनाला विशेष महत्त्व मानले जाते. त्यामुळे या यशाबद्दल संस्थेचे व्यवस्थापन, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
एन.बी.ए.च्या डॉ. मित्तल यांच्या नेतृत्वाखालील सात सदस्यीय समितीने महाविद्यालयाला भेट देऊन शिक्षण प्रणाली, अध्यापन प्रक्रिया, संशोधन व सल्लागार सेवा, विद्यार्थी यशाचे प्रमाण, करिअर मार्गदर्शन, प्लेसमेंट, पायाभूत सुविधा, प्रकल्प कार्य, विद्यार्थ्यांचा अभिप्राय आणि आउटकम बेस्ड एज्युकेशन यांचे सखोल मूल्यमापन केले. विविध विभागांना भेटी देऊन आवश्यक कागदपत्रांची तपासणीही करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील यांनी या यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन करताना, ही मान्यता संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोनाची दखल असल्याचे सांगितले. भविष्यातही संस्था शैक्षणिक उत्कृष्टतेची परंपरा कायम राखेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. जैन यांनी महाविद्यालयाचे विशेष अभिनंदन करत सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे कौतुक केले. तर प्राचार्य डॉ. फारूक सय्यद यांनी या यशाचे श्रेय व्यवस्थापन, विभागप्रमुख, शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि उद्योग क्षेत्रातील सहकाऱ्यांना दिले.
मूल्यांकन प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी कुलगुरू डॉ. आर. के. जैन, प्राचार्य डॉ. फारूक सय्यद, सर्व डीन, विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आळंदी कचरा डेपोचा भोंगळ कारभार; मुक्या जनावरांचा बळी, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच!

0
आळंदी / मानवमित्र न्यूज प्रतिनिधी संदीप मुंगसे आळंदी नगरपरिषदेच्या कचरा डेपोतील गंभीर अनागोंदीमुळे केळगाव-सरली परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी आणि मुक्या जनावरांवर मोठे संकट ओढवले आहे. डेपोमध्ये...

आदर्श राष्ट्र गौरव सन्मान सोहळा-२०२६ : ह.भ.प. दिलीप महाराज ठाकरे यांना राज्यस्तरीय ‘आदर्श कीर्तनरत्न...

0
आळंदी | रोहिदास कदम: धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ह.भ.प. दिलीप महाराज शामराव ठाकरे यांना आदर्श राष्ट्र गौरव सन्मान सोहळा-२०२६ मध्ये राज्यस्तरीय...

सिंहगड रोडवर तरुणाची बेदम मारहाण करून हत्या; 15 जणांविरुद्ध गुन्हा, परिसरात खळबळ

0
पुणे |प्रतिनिधी अशोक कुंभार) पुण्यातील सिंहगड रोड परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादाचे पर्यवसान एका २२ वर्षीय तरुणाच्या निर्घृण हत्येत झाले....

आळंदी पोस्ट ऑफिसचा हलगर्जी कारभार; नागरिकांची गैरसोय असह्य – सुविधा न दिल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा...

0
आळंदी पोस्ट ऑफिसचा हलगर्जी कारभार; नागरिकांची गैरसोय असह्य – सुविधा न दिल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा आळंदी, दि. ३ (प्रतिनिधी : सचिन शिंदे) – लाखो वारकऱ्यांचे...

लोणीकंद पोलीस ठाण्यात वकिलाला मारहाणीचा आरोप; सीसीटीव्ही जप्त करून निष्पक्ष चौकशीची मागणी

0
पुणे |प संतोष कदम : पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायावर शिवाजीनगर न्यायालयातील वकील अॅड. साहिल शेख यांना बेदम मारहाण केल्याचा...

Translate »
error: Content is protected !!