Homeताज्या बातम्याहरगुडे येथे विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप; सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम

हरगुडे येथे विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप; सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम

हरगुडे (पुरंदर अशोक कुंभार)नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरगुडे येथे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम रोटरी क्लब ऑफ इंडिया, पुरंदर यांच्या वतीने आणि कैलासभाऊ धिवार यांच्या विशेष प्रयत्नातून आयोजित करण्यात आला.
याचबरोबर हरगुडे येथील सिद्धार्थनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सचिनजी धिवार यांच्या वतीने अंगणवाडीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनाही दप्तरांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले असून शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.
कार्यक्रमास जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सीमा लादे, शिक्षिका सौ. स्वाती गायकवाड, सौ. उज्वला ताकवले, सौ. निर्मला ताकवले, सौ. ज्योती जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक सचिव कैलासभाऊ धिवार, सामाजिक कार्यकर्ते सचिनजी धिवार, सौ. प्राजक्ता धिवार, प्रकाश धिवार, सुधीर धिवार व आदर्श धिवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत नियमित शाळेत उपस्थित राहून अभ्यासात प्रगती करण्याचे आवाहन केले. समाजातील दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्थांनी अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देणे ही काळाची गरज असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
शालेय विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थ, पालक व शिक्षकांनी स्वागत करत आयोजकांचे आभार मानले.
शिक्षणासाठी हातभार, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळाळी! 📚🎒

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शनिवारी पश्चिम घाटाच्या काही भागात तिप्पट पाऊस झाल्यानंतर पुणे जिल्ह्यासाठी आज यलो अलर्ट |...

0
पुणे शहरात शनिवारी तुरळक ठिकाणी पाऊस झाला पुणे : मान्सूनच्या थोड्याशा शांततेनंतर, भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, शनिवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24...

पुण्याला पुरंदर विमानतळाला जोडण्यासाठी दिवे घाटमार्गे दुहेरी बोगदे करण्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष, व्यवहार्यता अभ्यासाची मागणी...

0
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी पुणे जिल्ह्यातील तीन एलिव्हेटेड रोड कॉरिडॉरची पायाभरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्री...

युवक क्रांती दलाचे संस्थापक कुमार सप्तर्षी यांचे ८२ व्या वर्षी निधन पुणे बातम्या

0
पुणे : समाजवादी विचारवंत, माजी आमदार आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक कुमार सप्तर्षी यांचे शनिवारी शहरात निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.महाराष्ट्र...

53km एलिव्हेटेड कॉरिडॉर चाकणच्या रहदारीच्या दुःस्वप्नाला आशा देतो | पुणे बातम्या

0
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील तीन एलिव्हेटेड रोड कॉरिडॉरची पायाभरणी केली....

सुनेत्रा यांना पत्र लिहून पार्थची कारकीर्द संपुष्टात आणण्याच्या पक्षाच्या काही सदस्यांच्या प्रयत्नाकडे राष्ट्रवादीच्या प्रदेश...

0
राष्ट्रवादीचे राज्यसभा सदस्य पार्थ पवार पुणे : राष्ट्रवादीचे प्रदेश उपप्रमुख उदयकुमार आहेर यांनी पक्षप्रमुख सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून, त्यांचा मोठा मुलगा, राज्यसभा...

Translate »
error: Content is protected !!