Homeताज्या बातम्यासंयम सुटला! काम न दिल्यास रस्त्यावर उतरणार — भटकी-विमुक्त समाज एल्गार

संयम सुटला! काम न दिल्यास रस्त्यावर उतरणार — भटकी-विमुक्त समाज एल्गार

प्रतिनिधी अशोक कुंभार / काम मिळूनही भटकी-विमुक्तांना काम करू दिले जात नाही; गावगुंडगिरीला शासनाचा आळा हवा — बबनराव मोहिते
गावपातळीवर रोजगाराच्या योजना मंजूर होऊनही भटकी-विमुक्त समाजातील नागरिकांना प्रत्यक्षात काम करू दिले जात नसल्याच्या गंभीर तक्रारी समोर येत आहेत. “आमच्या गावात तुम्ही काम करायचे नाही,” अशी उघड दादागिरी करत काही गावगुंड व स्थानिक लोकप्रतिनिधी भटकी-विमुक्त समाजावर अन्याय करत असल्याचा आरोप होत आहे.
काम मंजूर झाले तरी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या आश्रयाने काही समाजकंटक काम करू देत नाहीत. ही सरळसरळ मनमानी असून, अशा सरपंच व सदस्यांवर शासनाने तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी भटकी-विमुक्त समाजाकडून करण्यात येत आहे.
याबाबत बोलताना भटकी-विमुक्त महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री बबनराव मोहिते यांनी सांगितले की, “भटकी-विमुक्त समाजाला जाणीवपूर्वक रोजगारापासून दूर ठेवले जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, गावगुंडगिरीला शासनाचा कठोर प्रतिबंध बसायलाच हवा. अन्यथा भटकी-विमुक्त समाजाला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.”
या प्रकारामुळे ग्रामीण भागातील भटकी-विमुक्त समाजात तीव्र संतापाची भावना असून, प्रशासनाने तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर, रुळावरून घसरल्याच्या चौकशी अहवालाला महिनाभर लागू शकतो

0
पुणे : सोमवारी सायंकाळी सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने २४ तासांच्या विस्कळीत झालेल्या पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे वाहतूक बुधवारी पूर्वपदावर आली.रुळावरून घसरलेला वंदे...

वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रावेत, किवळे रहिवासी, नगरसेवक महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटले

0
पुणे : रावेत आणि किवळे येथील रहिवाशांनी स्थानिक नगरसेविका ऐश्वर्या तरस यांच्यासह बुधवारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण कंपनी लिमिटेड) च्या अधिकाऱ्यांची...

पांगारे गावचे माननीय पोलीस पाटील श्री. तानाजीराव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

0
पांगारे गावचे माननीय पोलीस पाटील श्री. तानाजीराव यांना वाढदिवसाच्या पांगरे गावचे माननीय पोलीस पाटील श्री तानाजी राव मनःपूर्वक, हार्दिक शुभेच्छा! 🎉🎂 आपण आपल्या जबाबदाऱ्या अत्यंत...

पुण्यातील जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरीन वायूची गळती; 24 रुग्णालयात दाखल

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात गुरुवारी क्लोरीन वायू गळती झाल्याने २४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी...

विनाअनुदानित महाविद्यालये खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतरित करण्यासाठी धोरण तयार करण्यासाठी तज्ञांची समिती

0
पुणे : अधिक स्वायत्तता आणि गती मिळावी यासाठी विनाअनुदानित सरकारी महाविद्यालयांचे खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतर करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाने...

Translate »
error: Content is protected !!