घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी प्रतिनिधी राहुल बोबडे शेवंता फाटा परिसरात बेकायदेशीर दारू वाहतूक सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. मानव मित्र न्यूजचे प्रतिनिधी राहुल बोबडे यांच्या निदर्शनास हा प्रकार आला असून त्यांनी यासंदर्भातील माहिती व दृश्ये सोशल मीडियावर प्रसारित केल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, जर अशा प्रकारे डुप्लिकेट किंवा अवैध दारूची खुलेआम वाहतूक व विक्री होत असेल, तर संबंधित यंत्रणा नेमकी काय करत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अवैध दारूमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. यापूर्वीही राज्यातील अनेक ठिकाणी बनावट दारूमुळे दुर्घटना घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित वाहनांची तपासणी करावी, दारूचा साठा जप्त करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग, स्थानिक पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मानव मित्र न्यूजचा सवाल : जर शेवंता फाटा परिसरात बेकायदेशीर दारूची वाहतूक आणि विक्री सुरू असेल, तर संबंधित प्रशासनाला याची माहिती नाही का? आणि माहिती असल्यास अद्याप कारवाई का झाली नाही?
“जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना पाठीशी घालणारे कोण?” या प्रश्नाचे उत्तर आता प्रशासनानेच द्यावे लागणार आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























