Homeताज्या बातम्याशिवरी ग्रामस्थांचा निकृष्ट विकासकामांविरोधात एल्गार; 20 जुलैपासून बेमुदत उपोषणाचा इशारा

शिवरी ग्रामस्थांचा निकृष्ट विकासकामांविरोधात एल्गार; 20 जुलैपासून बेमुदत उपोषणाचा इशारा

पुरंदर |( मानव मित्र न्यूज अशोक कुंभार)
पुरंदर तालुक्यातील शिवरी गावातील इनाम वस्ती येथे स्थानिक आमदार विकास निधीतून करण्यात आलेल्या विकासकामांबाबत ग्रामस्थांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत. मंजूर अंदाजपत्रकानुसार (इस्टिमेट) काम झाले नसून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित विकासकामांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. याबाबत ठेकेदाराकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. उलट “काम इस्टिमेटप्रमाणेच झाले आहे, तुम्हाला जे करायचे ते करा” अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना निवेदन देऊन संबंधित कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी केली आहे. तसेच मंजूर अंदाजपत्रकाची प्रत मराठी भाषेत उपलब्ध करून देण्यात यावी, कामाची तांत्रिक चौकशी करण्यात यावी आणि दोषी अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास 20 जुलै 2026 पासून लोकशाही मार्गाने बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करण्यात येईल. आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास किंवा आंदोलनकर्त्यांची प्रकृती बिघडल्यास त्यास संबंधित प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या आंदोलनात विकास काशिनाथ निंभोरे, महादेव बाळासो खोमणे, संजय सुदाम खोमणे, दत्तात्रेय बाळासाहेब खोमणे, दत्तात्रेय अशोक खोमणे, दत्तात्रेय लिंबोरे, अजय विजय लिंबोरे, ईश्वर अशोक खोमणे, सचिन लहू कामठे यांच्यासह शिवरी गावातील अनेक ग्रामस्थ सहभागी होणार आहेत.
आता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासन या तक्रारींची कितपत गांभीर्याने दखल घेते, याकडे संपूर्ण शिवरी गावासह पुरंदर तालुक्याचे लक्ष लागले आहे.:
🔴 “शिवरीतील विकासकामांवर ग्रामस्थांचा आक्षेप; 20 जुलैपासून बेमुदत उपोषणाचा इशारा”.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्याला पुरंदर विमानतळाला जोडण्यासाठी दिवे घाटमार्गे दुहेरी बोगदे करण्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष, व्यवहार्यता अभ्यासाची मागणी...

0
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी पुणे जिल्ह्यातील तीन एलिव्हेटेड रोड कॉरिडॉरची पायाभरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्री...

युवक क्रांती दलाचे संस्थापक कुमार सप्तर्षी यांचे ८२ व्या वर्षी निधन पुणे बातम्या

0
पुणे : समाजवादी विचारवंत, माजी आमदार आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक कुमार सप्तर्षी यांचे शनिवारी शहरात निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.महाराष्ट्र...

53km एलिव्हेटेड कॉरिडॉर चाकणच्या रहदारीच्या दुःस्वप्नाला आशा देतो | पुणे बातम्या

0
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील तीन एलिव्हेटेड रोड कॉरिडॉरची पायाभरणी केली....

सुनेत्रा यांना पत्र लिहून पार्थची कारकीर्द संपुष्टात आणण्याच्या पक्षाच्या काही सदस्यांच्या प्रयत्नाकडे राष्ट्रवादीच्या प्रदेश...

0
राष्ट्रवादीचे राज्यसभा सदस्य पार्थ पवार पुणे : राष्ट्रवादीचे प्रदेश उपप्रमुख उदयकुमार आहेर यांनी पक्षप्रमुख सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून, त्यांचा मोठा मुलगा, राज्यसभा...

शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा!” – सासवडमध्ये उभाठा गटाचे अभिजीत जगताप यांचे आमरण उपोषण

0
सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) प्रतिनिधी अशोक कुंभार दि. 17 जुलै 2026 : राज्यातील शिक्षण व्यवस्थेतील वाढता भ्रष्टाचार, वारंवार होणारी परीक्षा पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या...

Translate »
error: Content is protected !!