Homeताज्या बातम्यारामनवमी निमित्त आळंदी, मरकळ व परिसरात भक्तिमय वातावरण; विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात...

रामनवमी निमित्त आळंदी, मरकळ व परिसरात भक्तिमय वातावरण; विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न :

आळंदी, दि. २६ मार्च (वार्ताहर रविदास कदम)

रामनवमी निमित्त आळंदी, मरकळ, देवाची मोशी व परिसरात प्रभू श्रीरामचंद्र जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन, दिंड्या, मिरवणुका आणि महाप्रसाद वाटप यामुळे परिसरात दिवसभर रामनामाचा गजर घुमत होता.

श्री क्षेत्र मरकळ, आळंदी, देवाची मोशी या ठिकाणी प्रभू श्रीरामाची भव्य शुभयात्रा काढण्यात आली. या शुभयात्रेत वारकरी, महिला मंडळे, युवक मंडळे आणि भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. “जय श्रीराम”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

मरकळ येथे दत्तभक्त ताई माऊली यांच्या वतीने राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. गोरक्ष महाराज वर्पे यांचे कीर्तनरूपी रामजन्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कीर्तनामध्ये श्रीराम जन्माचा प्रसंग भावपूर्ण शैलीत मांडण्यात आला. उपस्थित भाविकांनी मोठ्या श्रद्धेने कीर्तनाचा लाभ घेतला.

तसेच वारकरी संप्रदायाच्या दिंड्या पथकांसह मरकळ येथील मारुती मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. टाळ-मृदुंगाच्या गजरात, भगव्या पताकांच्या फडक्यात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

आळंदी येथे आवेकर-भावे श्रीरामचंद्र संस्थान यांच्या वतीने प्रभू श्रीरामांची नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. या वेळी हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. मंदिर परिसर आकर्षक पुष्पसजावटीने सजविण्यात आला होता.

यावेळी आळंदी ग्रामस्थांच्या वतीने प्रभू श्रीरामाची भव्य दिव्य रोषणाई मिरवणूक काढण्यात आली. सजविलेल्या रथामध्ये श्रीराम, सीता, लक्ष्मण यांच्या मूर्तींची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

रामनवमी उत्सवानिमित्त आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी श्री भीम नरके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व स्टाफ यांनी चोख बंदोबस्त ठेवून शिस्तबद्ध मिरवणुकीसाठी सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सरकारी शाळांमधील एआय टूल्स विद्यार्थ्यांना शिकण्यात, मूलभूत गणितांमध्ये मदत करतात

0
पुणे : मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता तिसरीचा विद्यार्थी यश खोमणे याने गेल्या वर्षीपर्यंत क्वचितच वर्गात उत्तर देण्यासाठी हात वर केला होता. तो मूलभूत...

आळंदी मंदिरात अक्षय तृतीया दिनी श्रींचे विठ्ठल रूप चंदनउटी — भाविकांची मोठी गर्दी

0
  आळंदी (अशोक कुंभार प्रतिनिधी ) : अक्षय तृतीया निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर येथे श्रींचे वैभवी विठ्ठल रूप चंदनउटीद्वारे साकारण्यात आले....

AFMC डॉक्स पुणे कँट हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया काळजी वाढवतात

0
पुणे: सरदार वल्लभभाई पटेल पुणे कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलने आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (एएफएमसी) ने आपले विशेष डॉक्टर सुविधेवर तैनात केल्यानंतर शेकडो रुग्णांसाठी...

एनसीडब्ल्यूने परतवाडा प्रकरणातील आरोपींवर कठोर आरोपांची मागणी केली आहे

0
पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) अधिकाऱ्यांना अमरावतीमधील परतवाडा प्रकरणाच्या संदर्भात फॉरेन्सिक विश्लेषण जलदगतीने करण्याचे आणि दर पाच दिवसांनी प्रगती अहवाल सादर करण्याचे...

EMI चुकवण्यासाठी बनावट नंबर प्लेट वापरल्याबद्दल एसयूव्ही मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला

0
पुणे: वाघोली पोलिसांनी शुक्रवारी शिरूर येथील एका व्यक्तीवर (३२) बनावट नोंदणी प्लेटचा वापर करून कर चुकवण्यासाठी आणि कारचे कर्ज EMI चुकवल्याप्रकरणी फसवणुकीचा...

Translate »
error: Content is protected !!