Homeताज्या बातम्यामांढर परिसरातील वनव्यामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान; दानशूरांच्या मदतीने मोफत चारा वाटप

मांढर परिसरातील वनव्यामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान; दानशूरांच्या मदतीने मोफत चारा वाटप

मांढर, ता. पुरंदर, जि. पुणे (प्रतिनिधी अशोक कुंभार)

मांढर व परिसरातील डोंगराळ भागात आठ दिवसांपूर्वी लागलेल्या भीषण वनव्यामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान झाले. या आगीत अनेक शेतकऱ्यांच्या गवताच्या गंजी व जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा जळून खाक झाला. पशुपालनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे पुढील चार ते पाच महिन्यांचे चाऱ्याचे नियोजन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.

घटनेनंतर तहसील कार्यालयाला कळवून पंचनामा करण्यात आला असला तरी शासकीय मदत मिळण्यास वेळ लागण्याची शक्यता असल्याने स्थानिक स्तरावर मदतीचा पुढाकार घेण्यात आला. मांढर गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार पुरंदर-हवेलीचे माजी आमदार संजय चंदूकाका जगताप, जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ लोळे आणि पंचायत समिती सदस्य सायलीताई डॉ. मनोज शिंदे यांच्या सहकार्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोफत चारा उपलब्ध करून देण्यात आला.

या मदतकार्याला जेजुरी येथील आनंदी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. सुमित काकडे, बाळासाहेब लोळे तसेच पानवडी गावचे माऊली बापू भिसे यांनीही मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या मदतीने ऊस व वाड्याच्या गाड्या मागवून नुकसानग्रस्त पशुपालकांना चारा वाटप करण्यात आले.

या आगीत नानासो शेळके यांच्या सात गवताच्या गंजी जळून खाक झाल्या. तसेच राजेंद्र शिर्के, विलास लक्ष्मण शिर्के, शिवाजी शिर्के, बापू खोमणे, दत्तू खोमणे, कमल खोमणे, धनाजी शेळके, बापू शेळके आदी पशुपालकांचेही मोठे नुकसान झाले असून त्यांना या उपक्रमातून मोफत चारा देण्यात आला.

चारा वाटप कार्यक्रमावेळी माजी सरपंच विश्वास तात्या शिर्के, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष दीपक पापळ, दत्तात्रय आप्पासाहेब पापळ, दादा खोमणे, गोपाळ उत्तरकर, धनाजी शिर्के, उद्धव शिर्के, स्नेहल सोनू काशीद, माजी सरपंच वंदना शिर्के, सदाशिव शिर्के, नामदेव शिर्के यांसह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विश्वास तात्या शिर्के यांनी तातडीने चारा उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व मदतकर्त्यांचे आभार मानले. तसेच भविष्यातही शेतकरी व पशुपालकांना अशाच प्रकारे मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

दरम्यान, डॉ. मनोज शिंदे यांनी सांगितले की, काळदरी खोऱ्यातील गरजू पशुपालकांना मदत करण्यासाठी पुढील काळातही प्रयत्न सुरू ठेवले जातील. मिळणारी मदत ही तळागाळातील गरजू पशुपालकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी नमूद केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पौड फाटा-बालभारती रस्त्याला ग्रीन क्लिअरन्ससाठी लवकरच सल्लागार

0
पुणे : पौड फाटा-बालभारती रस्त्याच्या पर्यावरण मंजुरीसाठी सल्लागार नेमण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीने गुरुवारी मंजुरी दिली, त्याला हरित कार्यकर्त्यांचा विरोध आहे.पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) निविदा...

कंपनीचे 23 लॅपटॉप चोरल्याप्रकरणी आयटी विश्लेषक अटक

0
पुणे : उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी चाकण एमआयडीसीतील एका बहुराष्ट्रीय फूड पॅकेजिंग फर्मच्या आयटी विश्लेषकाला गेल्या दोन वर्षांत कंपनीचे 8 लाख रुपये किमतीचे...

हादरलं! चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण खून; ६५ वर्षीय आरोपी पोलिसांच्या ताब्यात

0
हादरलं! चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण खून; ६५ वर्षीय आरोपी पोलिसांच्या ताब्यात Pune / प्रतिनिधी : अशोक कुंभार पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एक अत्यंत धक्कादायक...

पुणे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये सेल्फी काढताना तीन तरुण बुडाले

0
पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात तीन तरुणांचा धरणाच्या मागील पाण्यात बुडून मृत्यू झाला. नवलख उंब्रे गावाजवळील जाधववाडी धरणावर...

पुणे : भोरमध्ये 4 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, 65 वर्षीय वृद्धाची हत्या

0
पुणे : भोरमध्ये 4 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, 65 वर्षीय वृद्धाची हत्या पुणे - महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एका गावात एका चार वर्षांच्या मुलीवर...

Translate »
error: Content is protected !!