Homeताज्या बातम्यामहार वतन जमिनीतून रस्ता करण्याच्या आदेशाला स्थगिती द्या – विष्णूदादा भोसले आरपीआय

महार वतन जमिनीतून रस्ता करण्याच्या आदेशाला स्थगिती द्या – विष्णूदादा भोसले आरपीआय

महार वतन जमिनीतून रस्ता करण्याच्या आदेशाला स्थगिती द्या – विष्णूदादा भोसले
पुरंदर | प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील मौजे आंबोडी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील इनाम वर्ग ६ ब महार वतन शेतजमिनीतून रस्ता करण्यास परवानगी देणाऱ्या आदेशाला तात्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी ज्येष्ठ रिपब्लिकन नेते विष्णूदादा भोसले यांनी केली आहे.
महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४३ अन्वये, पुरंदरचे तहसिलदार विक्रम राजपूत यांनी उद्योजक अन्वर शेख यांना महार वतन जमिनीतून रस्ता मंजूर केला आहे. हा आदेश बेकायदेशीर व नियमबाह्य असल्याचा आरोप करत, पीडित शेतकरी प्रकाश रणपिसे, चंद्रकांत रणपिसे व अशोक रणपिसे यांनी उपविभागीय अधिकारी तथा प्रांत, पुरंदर यांच्या कार्यालयासमोर सोमवार, दि. १९ जानेवारी २०२६ पासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनाला पाठिंबा देताना विष्णूदादा भोसले म्हणाले की, संबंधित महार वतन जमिनीत पाणंद रस्ता नाही, शिवरस्ता नाही, तसेच लोकवस्तीही नाही. असे असतानाही सासवडचे मंडल अधिकारी सुहास कांबळे यांच्या अहवालाच्या आधारे तहसिलदारांनी मुळ शेतकरी नसलेल्या व्यक्तीस रस्ता मंजूर केला आहे. ही कारवाई संशयास्पद असून, आर्थिक तडजोडीतून संगनमताने नियमबाह्य निर्णय घेतल्याचा गंभीर आरोप पीडित शेतकऱ्यांनी केला आहे.
सदर आदेशाला उपविभागीय अधिकारी तथा प्रांत, पुरंदर यांनी तात्काळ स्थगिती द्यावी, अन्यथा रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड (आठवले) यांच्या वतीने पुरंदर तालुक्यातील तहसिलदार व प्रांताधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालाची खातेनिहाय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येईल, असा इशाराही भोसले यांनी दिला. मागणी मान्य न झाल्यास पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पीडित शेतकरी, रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष बळीराम सोनवणे, पुरोगामी संघर्ष परिषदेचे प्रदेश युवक अध्यक्ष मनोज भिसे, ज्येष्ठ नेते पंढरीनाथ आढागळे, जिल्हाध्यक्ष गोकुळ भिसे, पश्चिम महाराष्ट्र नेते संदीप भोंडे, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे तालुका कार्याध्यक्ष सुधीर शेलार, कालीदास उबाळे, असिफ शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अधिक मास महोत्सवात भक्ती, ज्ञान आणि हरिनामाचा संगम; भाविकांना अध्यात्मिक मेजवानी रंगनाथ महाराज परभणीकर...

0
आळंदी (प्रतिनिधी रोहिदास कदम)पवित्र अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेला अधिक मास महोत्सव ब्र. भू. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी व ब्र. भू. गुरुवर्य श्री किसन...

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे

0
महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे कोल्हापूर : म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास १४...

इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

0
पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या...

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

Translate »
error: Content is protected !!