पुणे जिल्ह्यातील खेड तालुका दौंडकरवाडी रामनगरशेतकरी भरत शिवराम लांडे यांच्या शेळ्यांच्या गोठ्यात काल रात्री बिबट्याने अचानक हल्ला केला. या भीषण हल्यात गोठ्यातील तब्बल सोळा शेळ्यांची पिल्ले जागीच मृत्यूमुखी पडली.
घटनेची माहिती मिळताच चाकण वनविभागाला कळविण्यात आले. यानंतर वनपाल पवन आहेर, वनरक्षक सागर चव्हाण आणि रावसाहेब … यांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकऱ्यांनी वनविभागाकडे बिबट्याला तातडीने पकडण्याची मागणी केली आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम























