(पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार ) वडिलोपार्जित जमिनीच्या नोंदणीसाठी मोठा दिलासा; शेतकऱ्यांना हजारोंची बचत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. वडिलोपार्जित शेतजमिनीची कुटुंबातील वारसांमध्ये वाटणी करण्यासाठी लागणारे मोठे नोंदणी शुल्क आता मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आले आहे.
यापूर्वी अशा वाटणीसाठी 15 हजार ते 30 हजार रुपयांपर्यंत खर्च येत होता. मात्र, नव्या निर्णयानुसार आता ही प्रक्रिया फक्त 100 रुपयांत पूर्ण करता येणार आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली जमीन वाटणी प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार आहे. तसेच कुटुंबातील वाद कमी होऊन सातबारा उताऱ्यावर नाव नोंदणी करणेही सोपे होणार आहे.
ही सवलत फक्त कुटुंबातील वारसदारांमध्ये होणाऱ्या वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीसाठी लागू आहे. बाहेरील व्यक्तींना जमीन हस्तांतरित करण्यासाठी हा नियम लागू होणार नाही.
सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सोपे होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























