Homeताज्या बातम्यापुणे विषारी दारू प्रकरण : भिवंडीत FDA ची धडक कारवाई, मेथेनॉल साठा...

पुणे विषारी दारू प्रकरण : भिवंडीत FDA ची धडक कारवाई, मेथेनॉल साठा जप्त

मानव मित्र न्यूज |मुंबई प्रतिनिधी
पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात घडलेल्या विषारी दारू दुर्घटनेनंतर राज्यातील यंत्रणा सतर्क झाली असून या प्रकरणाचे धागेदोरे आता ठाणे जिल्ह्यातील भिवंडीपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी परिसरात विशेष तपास मोहीम राबविण्यात आली.
तपासादरम्यान संशयित ठिकाणांवर छापे टाकून मेथेनॉलसह विविध रसायनांचा साठा जप्त करण्यात आला. पुणे विषारी दारू प्रकरणात वापरण्यात आलेल्या मेथेनॉलचा पुरवठा या भागातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या संपूर्ण पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी FDA आणि पोलीस यंत्रणा संयुक्तपणे तपास करत आहेत.
या दुर्घटनेत अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली असून अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांविरोधात व्यापक मोहीम सुरू करण्यात आली आहे. तपास यंत्रणा संबंधित आरोपी, पुरवठादार आणि रसायन विक्रेत्यांची चौकशी करत असून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोर आणि बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नसल्याचा इशारा दिला आहे. राज्यभरात अशा कारवाया सुरू राहणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आळंदी कचरा डेपोचा भोंगळ कारभार; मुक्या जनावरांचा बळी, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच!

0
आळंदी / मानवमित्र न्यूज प्रतिनिधी संदीप मुंगसे आळंदी नगरपरिषदेच्या कचरा डेपोतील गंभीर अनागोंदीमुळे केळगाव-सरली परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी आणि मुक्या जनावरांवर मोठे संकट ओढवले आहे. डेपोमध्ये...

आदर्श राष्ट्र गौरव सन्मान सोहळा-२०२६ : ह.भ.प. दिलीप महाराज ठाकरे यांना राज्यस्तरीय ‘आदर्श कीर्तनरत्न...

0
आळंदी | रोहिदास कदम: धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ह.भ.प. दिलीप महाराज शामराव ठाकरे यांना आदर्श राष्ट्र गौरव सन्मान सोहळा-२०२६ मध्ये राज्यस्तरीय...

सिंहगड रोडवर तरुणाची बेदम मारहाण करून हत्या; 15 जणांविरुद्ध गुन्हा, परिसरात खळबळ

0
पुणे |प्रतिनिधी अशोक कुंभार) पुण्यातील सिंहगड रोड परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादाचे पर्यवसान एका २२ वर्षीय तरुणाच्या निर्घृण हत्येत झाले....

आळंदी पोस्ट ऑफिसचा हलगर्जी कारभार; नागरिकांची गैरसोय असह्य – सुविधा न दिल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा...

0
आळंदी पोस्ट ऑफिसचा हलगर्जी कारभार; नागरिकांची गैरसोय असह्य – सुविधा न दिल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा आळंदी, दि. ३ (प्रतिनिधी : सचिन शिंदे) – लाखो वारकऱ्यांचे...

लोणीकंद पोलीस ठाण्यात वकिलाला मारहाणीचा आरोप; सीसीटीव्ही जप्त करून निष्पक्ष चौकशीची मागणी

0
पुणे |प संतोष कदम : पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायावर शिवाजीनगर न्यायालयातील वकील अॅड. साहिल शेख यांना बेदम मारहाण केल्याचा...

Translate »
error: Content is protected !!