Homeताज्या बातम्यापाषाणमधील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत; नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात

पाषाणमधील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत; नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात

पुणे |सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार
उन्हाळी सुट्टीनंतर अखेर शाळांची घंटा पुन्हा एकदा वाजली आणि विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा परिसर पुन्हा चैतन्यमय झाला. पाषाण येथील वेणूताई यशवंतराव चव्हाण प्राथमिक विद्यालय, मनपा शाळा क्रमांक ७१ सुतारवाडी येथे नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांचे औक्षण करून तसेच गुलाबपुष्प देत त्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्सुकता स्पष्ट दिसून येत होती. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या नगरसेविका रोहिणी चिमटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
“शिक्षण हाच जीवनात यशस्वी होण्याचा आणि आत्मविश्वास मिळविण्याचा खरा मार्ग आहे. शिक्षणाच्या बळावर प्रत्येक विद्यार्थ्याने जीवनात मोठे यश संपादन करावे,” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाला सचिन पाषाणकर, राजेंद्र पाषाणकर, सोनाली सुतार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. या स्वागत समारंभाचे आयोजन स्वीकृत नगरसेवक सतीश पाषाणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत उत्साह निर्माण करणारा हा उपक्रम पालक आणि नागरिकांकडूनही कौतुकास पात्र ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आळंदी पोस्ट ऑफिसचा हलगर्जी कारभार; नागरिकांची गैरसोय असह्य – सुविधा न दिल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा...

0
आळंदी पोस्ट ऑफिसचा हलगर्जी कारभार; नागरिकांची गैरसोय असह्य – सुविधा न दिल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा आळंदी, दि. ३ (प्रतिनिधी : सचिन शिंदे) – लाखो वारकऱ्यांचे...

लोणीकंद पोलीस ठाण्यात वकिलाला मारहाणीचा आरोप; सीसीटीव्ही जप्त करून निष्पक्ष चौकशीची मागणी

0
पुणे |प संतोष कदम : पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायावर शिवाजीनगर न्यायालयातील वकील अॅड. साहिल शेख यांना बेदम मारहाण केल्याचा...

महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६ लागू; जबरदस्ती, फसवणूक व आमिषाने धर्मांतराला आळा मुंबई

0
पुरंदर| (प्रतिनिधी अशोक कुंभार) महाराष्ट्रात 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६' अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यभर लागू झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर ३० जुलैपासून...

कोल्हापुरात उभारले जाणार राज्यातील पहिले ‘अण्णाभाऊ साठे स्मृती व स्फूर्ती सदन’

0
पुरंदर सासवड| (प्रतिनिधी अशोक कुंभार): लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी कोल्हापूर येथे राज्यातील पहिले ‘अण्णाभाऊ साठे स्मृती...

आळंदीत जाणीव संघटने तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

0
आळंदी / वार्ताहर माऊली घुंडरे:)येथील जाणीव संघटना प्रणित महिला मंडळ, पथारी व्यवसायिक यांचे वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...

Translate »
error: Content is protected !!