Homeताज्या बातम्यापवित्र इंद्रायणीसाठी अखिल भारत हिंदू महासभेचा एल्गार

पवित्र इंद्रायणीसाठी अखिल भारत हिंदू महासभेचा एल्गार

  • पुणे/आळंदी रविदास कदम ): तीर्थक्षेत्र आळंदीची जीवनवाहिनी असलेल्या इंद्रायणी नदीच्या दुरवस्थेबाबत अखिल भारत हिंदू महासभाने आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला कडक शब्दांत निवेदन सादर केले आहे. वाढते प्रदूषण, सांडपाणी आणि जलपर्णीच्या विळख्यात अडकलेल्या नदीला तातडीने मुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महासभेचे वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष वैभवराज रौंदळ आणि नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी पुणे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि आळंदी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली.

🔴 महासभेच्या प्रमुख मागण्या

1️⃣ सांडपाणी थेट नदीत सोडणे त्वरित बंद करा

आळंदीतील मैलापाणी व ड्रेनेज प्रक्रिया न करता नदीत सोडले जात असल्याचा आरोप करत, सांडपाण्यावर पुनर्वापर प्रक्रिया (STP) प्रभावीपणे राबवण्याची मागणी.

2️⃣ जलपर्णी व राडारोडा हटवा

नदीपात्रातील जलपर्णी व कचऱ्यामुळे पाणी दूषित होत असल्याने तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी.

3️⃣ जलशुद्धीकरण प्रकल्प प्रभावी करा

भाविकांना पवित्र आणि सुरक्षित पाणी मिळावे यासाठी जलशुद्धीकरण यंत्रणा सक्षम करावी.

4️⃣ बंधाऱ्याची दुरुस्ती करा

गळती रोखून पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करावे.

5️⃣ नियमित पोलीस पेट्रोलिंग सुरू करा

नदी परिसरात अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर व अवैध कृत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी गस्त वाढवावी.

⚠️ “धार्मिक भावनांशी खेळू नका!”

“इंद्रायणी नदीचे पावित्र्य राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास अखिल भारत हिंदू महासभा आपल्या स्टाईलने तीव्र आंदोलन छेडेल,” असा इशारा वैभवराज रौंदळ यांनी दिला.

यावेळी राष्ट्रीय संरक्षक श्री श्री 1008 जगतगुरू स्वामी माधवानंद सरस्वती जी महाराज, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष योगेंद्र वर्मा जी, महंत शिवनाथ जी महाराज, योगी दादानाथ जी महाराज, योगी ऋषिकेशनाथ जी महाराज, महंत सचिदानंद सरस्वती जी महाराज, महंत योगानंद सरस्वती जी महाराज, महंत केशवानंद सरस्वती जी महाराज, भावेश बळीराम पाटील, योगी सिद्धनाथ जी महाराज, योगी शीतलनाथ जी महाराज, योगी प्रकाशनाथ जी महाराज, योगी सुंदरनाथ जी महाराज, योगेश (सर) निंबाळकर, सौं. राणी पवार, सौ. आरती राजपूत, सौ. प्रिया राव, पुनम गांगुर्डे, अंकित वाघ, दिनेश माळी, अजिंक्य महांकाळे, शशिकांत शिंदे, विष्णू भाऊ बिचकुले, अशोक कुमार नानू राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या निवेदनामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून वारकरी संप्रदाय व स्थानिक नागरिकांनी महासभेच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जेव्हा लाल झेंडे बंद, बाजा आणि बारात

0
पुणे: आमंत्रणे पाठवली गेली आणि पोशाख फायनल झाले. कुटुंब आणि जवळचे मित्र तिथे होते. संगीत ओव्हर होते आणि बारात तिच्या दारात होती,...

आळंदीतील रहिवासी टंचाईशी झगडत आहेत, नागरी समस्यांमुळे दररोज पाणी विकत घ्यावे लागत आहे

0
पुणे: आळंदीच्या मंदिरातील रहिवाशांना जगण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे कारण नगरपरिषदेच्या अनियमित आणि अपुऱ्या पिण्यायोग्य पाणीपुरवठ्यामुळे त्यांचा आर्थिक बोजा वाढून त्यांना दररोज पाणी...

पोलिसांच्या कारवाईविरोधात टँकरचालकांनी बुधवारपासून संपाचा इशारा दिला आहे

0
पुणे: उंड्री, महंमदवाडी आणि एनआयबीएम रोडसह अनेक भागातील पाण्याच्या टँकर चालकांनी त्यांच्या वाहनांवर क्लिनर (सहाय्यक) नसल्याबद्दल पोलिसांकडून छळ केल्याचा आरोप करत बुधवारपासून...

रावेत येथील रहिवाशांनी जमिनीची खोटी पावती वापरून नातेवाइकांना ७५ लाखांची फसवणूक केली

0
पुणे : रावेत पोलिसांनी परिसरातील एका रहिवाशाविरुद्ध आपल्या नातेवाइकांना ७५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.आरोपीने रावेत परिसरात त्याच्या नातेवाईकांच्या...

रहिवाशांच्या तक्रारींनंतर पीएमसीने तीन महिन्यांत पुण्यातील 30 आरएमसी प्लांटवर कारवाई केली

0
पुणे: नागरिकांच्या अनेक तक्रारींनंतर नागरी संस्थेने शहरातील रेडी मिक्स काँक्रीट प्लांट्स विरोधात मोहीम तीव्र केली आहे. गेल्या तीन महिन्यांत, पुणे महानगरपालिकेने (पीएमसी)...

Translate »
error: Content is protected !!