परतूरला ‘आदर्श शहर’ बनवण्याचा निर्धार; लोणीकरांचा विकास आराखडा, फडणवीसांची कौतुकाची थाप
परतूर | प्रतिनिधी – गजानन राजबिंडे
परतूर शहराचा बदलता चेहरा आज सर्वांसमोर उभा आहे. परतूरच्या विकासासाठी आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे शहरात तब्बल ₹700 कोटींची विकासकामे पूर्णत्वास जात आहेत. ‘‘परतूरसाठी लोणीकरांनी आणलेला निधी म्हणजे खऱ्या अर्थाने विकासनिष्ठ राजकारणाची ताकद,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केले.
‘महाविजय संकल्प सभेत’ बोलताना मुख्यमंत्री म्हणाले —
“आम्ही परतूरसाठी 500 कोटींची मागणी केली तेव्हा ‘निधीची कमतरता पडणार नाही’ याची हमी दिली होती. नगराध्यक्ष भाजपाचा नसतानाही लोणीकरांनी ‘हे माझं शहर’ म्हणत 700 कोटी रुपयांचा निधी आणला. परतूरला मराठवाड्यातील ‘आदर्श शहर’ बनवण्याचा आमचा निर्धार आहे.”
मुख्यमंत्र्यांचे महत्वाचे मुद्दे
परतूरमधील काँक्रीट रस्ते, न्यायालय, अत्याधुनिक प्रशासकीय इमारती, दर्जेदार वसतिगृह ही लोणीकरांच्या पाठपुराव्याची फळे.
जालना–छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक विकासाचा थेट लाभ परतूरला मिळणार.
‘‘२ तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या…पुढील ५ वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ!’’
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, अशी स्पष्ट हमी.
फिल्टर पाणी घराघरात पोहोचवण्याचे नरेंद्र मोदींचे स्वप्न लोणीकरांनी वॉटर ग्रीडद्वारे परतूरात पूर्ण केले.
पंतप्रधान आवास योजना, हर घर सोलार, 100% भुयारी गटार, कचरा प्रक्रिया, सांडपाणी योजना राबवण्यावर भर.
लोणीकरांचे विधान : “पराभव झालो तरी शहरासाठी काम थांबवले नाही”
आमदार बबनराव लोणीकर म्हणाले —
‘‘मागील निवडणुकीत पराभव झाला तरी शहराच्या विकासासाठी प्रयत्न थांबवले नाहीत. मुख्यमंत्री फडणवीसांकडून मागितलेल्या 500 कोटींपेक्षा अधिक म्हणजे 700 कोटी रुपये परतुरला मिळवून दिले.’’
निधीचा तपशील
शहरातील रस्ते – ₹135 कोटी
वसतिगृह – ₹10 कोटी
नाट्यगृह – ₹19 कोटी
मुस्लिम बांधवांसाठी शादिखाना – ₹1 कोटी
भूमिगत गटार – ₹45 कोटी
रेल्वे उड्डाणपूल – ₹45 कोटी
सांस्कृतिक सभागृह – 300 गावे
वॉटर ग्रीड – ₹600 कोटी
शहरांतर्गत पाणीपुरवठा – ₹100 कोटी
संजय गांधी निराधार योजना – ₹210 कोटी
लाडकी बहीण योजना – ₹300 कोटी
‘‘परतूरची सुज्ञ जनता यावेळी भाजपाच्या बाजूने विकासाचा कौल देईल,’’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“राहुल, विकास आराखडा तयार कर; पूर्ण करण्याची जबाबदारी माझी!” — फडणवीस
कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल लोणीकरांना परतूर नगरपरिषदेसाठी विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी सोपवली, आणि तो आराखडा पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी स्वतःवर असल्याचे जाहीर केले.
भाजपाचे तरुण उमेदवार रिंगणात
परतूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाने तरुण व तडफदार उमेदवारांना मोठी संधी दिली आहे. नगराध्यक्ष पदासाठी प्रियांका शहाजी राक्षे यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवार मोठ्या मतांनी विजयी होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमातील मान्यवरांची उपस्थिती
मंचावर —
मंदाताई लोणीकर, प्रियंका शहाजी राक्षे, सतीश निर्वळ, नितीन राठोड, शत्रुघ्न कणसे, विक्रम उफाड, संदीप गोरे, रमेश भापकर, पंजाबराव बोराडे, गणेशराव खवणे आदींसह मोठ्या संख्येने परतूरकर उपस्थित होते.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम





















