Homeताज्या बातम्याजेजुरीत महार वतन जमिनीवरील बेकायदेशीर बांधकाम हटविण्याची मागणी; तानाजी भालेराव यांचे आमरण...

जेजुरीत महार वतन जमिनीवरील बेकायदेशीर बांधकाम हटविण्याची मागणी; तानाजी भालेराव यांचे आमरण उपोषण सुरू

पुरंदर (प्रतिनिधी अशोक कुमार): जेजुरी येथील इनाम वर्ग ६ ब महारवतन गट नं. १३६ मधील शेतजमिनीवर बेकायदेशीर गुंठेवारी विक्री करून उभारण्यात आलेली पक्की बांधकामे तात्काळ निष्काशीत करण्यात यावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तानाजी भालेराव यांनी केली असून या मागणीसाठी त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
सोमवार (दि. १६ फेब्रुवारी २०२६) रोजी सकाळी ११ वाजता जेजुरी नगरपालिकेसमोर हे उपोषण सुरू करण्यात आले. संबंधित जमिनीवर नियमबाह्य पद्धतीने प्लॉट विक्री करून घरे बांधण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच आनंदनगर येथील दलितवस्ती सुधार योजनेतील कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत त्याची सखोल चौकशी करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. याशिवाय जेजुरी नगरपरिषद घनकचरा प्रकल्प योजनेतही आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करून संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या आंदोलनास रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णूदादा भोसले, माजी नगराध्यक्ष अविनाश भालेराव, प्रदेश संघटक सचिव गोविंद जगताप, तालुका कार्याध्यक्ष सुधीर शेलार, शहराध्यक्ष रणजित भालेराव, युवानेते अनिकेत भालेराव, नवनिर्वाचित नगरसेवक तानाजी खोमणे, संतोष खोमणे तसेच भाऊ बनसोडे, काळू सरोदे, प्रितम आठवले, भिमसेन भालेराव, विनोद सोनवणे, सचिन भालेराव, नितीन सोनवणे, गणेश गाढवे, निखील गंगावणे, ओंकार चव्हाण आदींनी पाठिंबा दिला आहे.
संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा उपोषणकर्ते तानाजी भालेराव यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आळंदीतील रहिवासी टंचाईशी झगडत आहेत, नागरी समस्यांमुळे दररोज पाणी विकत घ्यावे लागत आहे

0
पुणे: आळंदीच्या मंदिरातील रहिवाशांना जगण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे कारण नगरपरिषदेच्या अनियमित आणि अपुऱ्या पिण्यायोग्य पाणीपुरवठ्यामुळे त्यांचा आर्थिक बोजा वाढून त्यांना दररोज पाणी...

पोलिसांच्या कारवाईविरोधात टँकरचालकांनी बुधवारपासून संपाचा इशारा दिला आहे

0
पुणे: उंड्री, महंमदवाडी आणि एनआयबीएम रोडसह अनेक भागातील पाण्याच्या टँकर चालकांनी त्यांच्या वाहनांवर क्लिनर (सहाय्यक) नसल्याबद्दल पोलिसांकडून छळ केल्याचा आरोप करत बुधवारपासून...

रावेत येथील रहिवाशांनी जमिनीची खोटी पावती वापरून नातेवाइकांना ७५ लाखांची फसवणूक केली

0
पुणे : रावेत पोलिसांनी परिसरातील एका रहिवाशाविरुद्ध आपल्या नातेवाइकांना ७५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.आरोपीने रावेत परिसरात त्याच्या नातेवाईकांच्या...

रहिवाशांच्या तक्रारींनंतर पीएमसीने तीन महिन्यांत पुण्यातील 30 आरएमसी प्लांटवर कारवाई केली

0
पुणे: नागरिकांच्या अनेक तक्रारींनंतर नागरी संस्थेने शहरातील रेडी मिक्स काँक्रीट प्लांट्स विरोधात मोहीम तीव्र केली आहे. गेल्या तीन महिन्यांत, पुणे महानगरपालिकेने (पीएमसी)...

आळंदी देवाची : जय जय गुणवंत महाराज फाऊंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

0
आळंदी देवाची रोहिदास कदम आळंदी देवाची : जय जय गुणवंत महाराज फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, आळंदी देवाची यांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या...

Translate »
error: Content is protected !!