(आळंदी रोहिदास कदम)
राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या रामदास कदम यांच्या खळबळजनक आरोपांवर अखेर उद्धव ठाकरे यांनी तोंड उघडलं आहे. पण त्यांनी फक्त दोन शब्दांतच संपूर्ण विषय संपवला.
पत्रकार परिषदेत विचारण्यात आले — “बाळासाहेबांची बॉडी दोन दिवस का ठेवली?”
यावर उद्धव ठाकरे म्हणाले :
“मी गद्दार आणि नमकहरामांना उत्तर देत नाही. ठाकरे कोण आहेत हे महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे गद्दार आणि हरामखोरांना उत्तर देत नाही.”
या एका वाक्यात उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांच्यावर थेट पलटवार केला.
🗣️ पत्रकारांना दिलेला संदेश
पुढे बोलताना त्यांनी माध्यमांबद्दल म्हणाले –
“लोकमान्य टिळक प्रश्न विचारू शकतात, तर आपण निवडून दिलेल्या सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार गमावला आहे का?
पत्रकारांनी ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ केलं पाहिजे.
अंधभक्तांना दृष्टी देणं हे पत्रकारांचं काम आहे.”
🤝 राज ठाकरेंसोबत एकत्र येण्याबाबत स्पष्टवक्तेपणा
राज ठाकरेंसोबत एकत्र येण्याच्या चर्चांवर उद्धव ठाकरे म्हणाले –
“2005 पासून आम्ही वेगळे झालो होतो.
एका मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो आणि तेव्हा लोकांचे धाबे दणाणले.
5 जुलैला मेळाव्यात आम्ही सोबत होतो. त्यामुळे रोज एकत्र आलो का असं विचारायची गरज नाही.”
त्यांनी पुढे सांगितलं की –
“राज ठाकरेंसोबत आमच्या काही भेटी झाल्या आहेत, पण अजून काही गोष्टी व्यवस्थित होऊ द्या.”
🎤 दसरा मेळावा आणि भविष्याचा संदेश
“शिवाजी पार्कात भाषण थांबवू का म्हटलं तरी लोक म्हणतात चालू ठेवा.
शिव्या देणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणारे हात जास्त आहेत,”
असं उद्धव ठाकरे म्हणाले.
🗳️ आघाडी म्हणून निवडणूक लढवणार का?
या प्रश्नावर त्यांनी सांगितलं –
“हा निर्णय तिन्ही पक्षांनी मिळून घ्यायचा आहे.
लोकसभा-विधानसभा आम्ही एकत्र लढलो.
स्थानिक नेत्यांच्या भावनाही समजून घेतल्या पाहिजेत.”
📺 संपूर्ण महाराष्ट्रात आता चर्चा सुरु आहे — उद्धव ठाकरेंच्या या ठाम भूमिकेनंतर ठाकरे-शिंदे संघर्ष आणखी तीव्र होणार

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम























