Homeताज्या बातम्याआळंदी PMPML बसस्थानक परिसरात दुर्दैवी घटना; बसच्या मागील चाकाखाली सापडून प्रवाशाचा मृत्यू

आळंदी PMPML बसस्थानक परिसरात दुर्दैवी घटना; बसच्या मागील चाकाखाली सापडून प्रवाशाचा मृत्यू

सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार)
आळंदी येथे सोमवारी दुपारी देहू-आळंदी मार्गावरील PMPML बसस्थानकावर दुर्दैवी घटना घडली. बसमधून उतरत असताना एका प्रवाशाचा तोल जाऊन तो थेट PMPML बसच्या मागील चाकाखाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर बसस्थानक परिसरात मोठी गर्दी झाली होती. स्थानिक नागरिक, भाविक आणि प्रवाशांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करत विद्यमान बसस्थानकाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, आळंदीतील सध्याचे बसस्थानक अरुंद आणि गर्दीचे झाले असून, भाविकांची मोठी वर्दळ असल्याने अपघाताचा धोका वाढत आहे. त्यामुळे बसस्थानक तत्काळ नदीपलीकडे हलविण्याची मागणी जोर धरत आहे. नदीपलीकडे PMPML साठी प्रशस्त जागा उपलब्ध असून, “पाच मिनिटे पायी चालावे लागले तरी चालेल, पण नागरिक आणि भाविकांची सुरक्षा महत्त्वाची,” अशी भूमिका नागरिकांनी मांडली आहे.
तसेच आळंदी नगरपरिषद, पोलिस प्रशासन आणि PMPML प्रशासनाने या घटनेचा सविस्तर अहवाल जाहीर करून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

3 वर्षीय मुलीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी 65 वर्षीय वृद्धाला पुण्यातील न्यायालयाने फाशीची शिक्षा...

0
सर्वोच्च न्यायालयाने परिभाषित केल्यानुसार हे प्रकरण "दुर्मिळातील दुर्मिळ" श्रेणीत येते, असे न्यायालयाने नमूद केले. पुणे - भोर तालुक्यातील नसरापूर गावात 1 मे रोजी...

लोहगड येथे सियाच्या उपस्थितीत पोलिस गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार करतात

0
पुणे : 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर मंगेतर सिया गोयल (20) आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांच्याकडून कथितपणे कथित कथित कथित...

नाशिक फाटा-खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी आमदारांची जमीन निधीची मागणी

0
पुणे-नाशिक महामार्ग हा राज्यातील सर्वात वर्दळीचा आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा रस्ता आहे पुणे : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) प्रस्तावित नाशिक फाटा-खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर...

DRDO नेक्स्ट-जनरेशन इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकलसाठी प्रगत कंपोझिट हल विकसित करते

0
चित्र केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी पुणे : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) शास्त्रज्ञ भारतीय सैन्यासाठी हलके, मजबूत आणि स्टिल्थियर रणांगण प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी...

पुण्यातील काही भागात कमी पावसानंतर आठवडाभरात पावसाची नोंद झाली

0
कोथरूडमध्ये रविवारी दुपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या पुणे : मान्सूनच्या जवळपास आठवडाभराच्या मंद गतीनंतर पुणे आणि आसपासच्या भागात रविवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली,...

Translate »
error: Content is protected !!