उपक्रम : आळंदीत दोन गणेश विसर्जन कुंडांची उभारणी
आळंदी, दि. ०५ :
आळंदी येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणी नदीचे पावित्र्य राखण्यासाठी व जलप्रदूषण रोखण्यासाठी शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या पुढाकाराने दोन कृत्रिम गणेश विसर्जन कुंडांची उभारणी करण्यात आली आहे.
वैष्णव मंदिराजवळ आणि चाकण चौकातील भाजी मंडई व वाहतूक पोलिस ठाणे परिसरात ही विसर्जन कुंडे उभारण्यात आली आहेत. या कुंडांमुळे गणेश भक्तांना आपल्या बाप्पाचे विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने करण्याची सुविधा मिळणार आहे.
शिवसेना व श्री आळंदी धाम सेवा समितीचे स्वयंसेवक या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आहेत. विसर्जन कुंड परिसरात स्वच्छता, सुरक्षितता आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची काळजी घेण्यात येत आहे.
या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले असून गणेशोत्सवाच्या समारोपाला पर्यावरण संरक्षण व भक्तीचा सुंदर संगम साधला जात आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























