“]आळंदी पोलीस स्टेशनतर्फे श्रींचे विसर्जन मंगलमय वातावरणात
(आळंदी प्रतिनिधी रविकदम)आळंदी पोलीस स्टेशन गणेशोत्सवातील श्रींचे विसर्जन हरिनाम-जयघोषात उत्साहात व मंगलमय वातावरणात पार पडले. श्रींचे विसर्जन कृत्रिम हौद्यात करण्यात आले.
यानंतर मूर्ती पुढील कार्यवाहीसाठी आळंदी नगरपरिषद मूर्ती संकलन केंद्रात सुपूर्द करण्यात आली.
या प्रसंगी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिंद्र रोडे यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी, महिला व पुरुष कर्मचारी पारंपरिक वेषभूषेत उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक नरके यांनी सांगितले की, “गणपती ही बुद्धीची प्रतीक देवता आहे. सर्वांना बुद्धी लाभावी, देश व समाजाची सेवा घडावी. आळंदीत शिस्तबद्धतेने गणपती विसर्जन करावे” अशी नम्र विनंती सर्व सार्वजनिक मंडळांना करण्यात आली.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























