Homeताज्या बातम्याआळंदी नगरपरिषद उपाध्यक्षपदी सौ.सुजाता कालिदास तापकीर बिनविरोध स्वीकृत सदस्यपदी राहुल चिताळकर पाटील...

आळंदी नगरपरिषद उपाध्यक्षपदी सौ.सुजाता कालिदास तापकीर बिनविरोध स्वीकृत सदस्यपदी राहुल चिताळकर पाटील व संदीप रासकर बिनविरोध माजी नगरसेवक तुषार घुंडरे पाटील यांचा अर्ज

आळंदी देवाची रविदास कदम माजी नगरसेवक तुषार घुंडरे पाटील यांचा अर्ज बाद:
आळंदी नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपच्या नगरसेविका सुजाता तापकीर यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपाध्यक्षपदासाठी विहित मुदतीत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने ही निवड जाहीर करण्यात आली.
स्वीकृत सदस्य पदासाठी एकूण तीन अर्ज प्राप्त झाले होते. यामध्ये माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, माजी नगरसेवक संदीप रासकर आणि माजी नगरसेवक तुषार घुंडरे पाटील यांचे अर्ज दाखल झाले होते. अर्ज छाननीदरम्यान तुषार घुंडरे पाटील यांच्याकडे अशासकीय संस्थेत पाच वर्षांचा अनुभव नसल्याने त्यांचा अर्ज अपात्र ठरविण्यात आला.
उर्वरित दोन अर्ज वैध ठरले असून, स्वीकृत सदस्य पदासाठी दोनच जागा असल्याने राहुल चिताळकर पाटील व संदीप रासकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. हे दोन्ही सदस्य ज्ञानोबा तुकाराम ट्रस्ट, आळंदी देवाची या संस्थेचे पदाधिकारी आहेत.
उपाध्यक्ष पदासाठी आलेला अर्ज वैध ठरल्याने एका जागेसाठी एकच अर्ज असल्यामुळे भाजपच्या नगरसेविका सुजाता तापकीर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे पाटील यांनी केली.
स्वीकृत सदस्य पदासाठी उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी यांच्याकडे अर्ज छाननी करण्यात आली. माजी नगरसेवक तुषार घुंडरे पाटील यांच्याकडे अशासकीय संस्थेतील पाच वर्षांचा अनुभव नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, त्यांनी आळंदी नगरपरिषदेत विविध पदांवर पाच वर्षे कार्य केले असून गटनेते म्हणूनही यशस्वीपणे काम केले असल्याचे नमूद करण्यात आले.
आळंदी नगरपरिषदेच्या पहिल्या सभेत सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार, अभिनंदन व स्वागत करण्यात आले. या वेळी मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सभेच्या कामकाजासाठी प्रशासकीय सहकार्य केले.
निवडीच्या स्वागतार्थ समर्थकांनी गुलाल, भंडारा व फटाक्यांची आतषबाजी करत शहरातून मिरवणूक काढली. मिरवणूक माऊली मंदिरात दर्शन घेऊन शांततेत उत्साहात पार पडली.
आता नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचे लक्ष विविध विषय समित्यांचे सभापती, उपसभापती व सदस्यांच्या निवडींकडे लागले असून, येत्या पंधरा दिवसांत यासाठी विशेष सर्वसाधारण सभा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून हार्दिक शुभेच्छा दिल्या. विविध सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते व समर्थकांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीड जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मरचे अवैध शिफ्टिंग करताना वीज पडून कामगाराचा मृत्यू झाला

0
AI वापरून प्रातिनिधिक प्रतिमा तयार केली बीड: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात कथितरित्या ट्रान्सफॉर्मर हलवताना एका ३५ वर्षीय मजुराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची माहिती...

कुंभार समाजजोती मंडळ, पुणे जिल्हा आयोजित राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा संपन्न होणार

0
पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) कुंभार समाजजोती मंडळ, पुणे जिल्हा यांच्या वतीने राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा रविवार दि....

संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावर RRC कारवाईचे आदेश; शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठे यश

0
घनसावंगी | प्रतिनिधी राहुल बोबडे पैठण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत एफआरपी (FRP) रकमेप्रकरणी प्रशासनाने संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावर कठोर कारवाईचे आदेश जारी...

यंदाच्या जानेवारी-मार्चमध्ये पुणे कार्यालय भाडेतत्त्वावर मंदावले; पुरवठा खंडित असताना भाडे वाढले

0
पुणे: 2026 च्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) पुण्यातील कार्यालयीन जागेची मागणी कमी झाली असून, गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 20 लाख चौरस फूट वरून...

वारकऱ्यांची टिप्पणी : राष्ट्रवादीचे प्रवक्ते लवांडे यांना पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला | पुणे...

0
पुणे: वाघोली पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या वारकरी संप्रदायाशी संबंधित संत आणि धार्मिक व्यक्तींबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे...

Translate »
error: Content is protected !!