Homeताज्या बातम्याआळंदी देवस्थान कोणालाही पाठीशी घालणार नाही – ॲड राजेंद्र उमाप

आळंदी देवस्थान कोणालाही पाठीशी घालणार नाही – ॲड राजेंद्र उमाप

प्रतिनिधी अशोक कुंभार
दानपेटी अपहार प्रकरणात चार जणांना चौकशी नोटिसा
श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिर येथे दानपेटीतील देणगी रकमेच्या अपहार प्रकरणानंतर देवस्थान प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, “या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही,” असा स्पष्ट इशारा पालखी सोहळा प्रमुख ॲड राजेंद्र उमाप यांनी दिला आहे.
आळंदीतील माऊली मंदिर भक्तनिवास येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, चैतन्य महाराज लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील, व्यवस्थापक माऊली वीर तसेच ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते.
दानपेटीतील रक्कम अपहार प्रकरणात संशयित सेवक विशाल वारुळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, लेखापाल आणि अन्नदान विभाग प्रमुख अशा चार जणांना खुलासा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधितांकडून स्पष्टीकरण प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे उमाप यांनी स्पष्ट केले.
देवस्थान प्रशासनाच्या माहितीनुसार, विशाल वारुळे हा अधिकृत कर्मचारी नव्हता. मात्र विविध विभागांमध्ये काम करताना त्याने सेवक व कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन केला होता. अन्नदान विभाग आणि पालखी सोहळ्यात आचारी म्हणूनही त्याने काम केले होते. त्यामुळे त्याच्यावर सुरुवातीला कोणालाही संशय आला नव्हता. मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासात त्याच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेनंतर देवस्थान प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर परिसरात कर्मचारी, सेवेकरी आणि सुरक्षा रक्षकांसाठी ओळखपत्र सक्तीचे करण्यात आले असून, प्रवेशद्वारातूनच ये-जा बंधनकारक करण्यात आली आहे. सर्वांची तपासणी सुरक्षा रक्षकांकडून केली जाणार असून, संशयास्पद वस्तू किंवा पिशव्यांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
दानपेटीतील रक्कम मोजणी प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा, आधुनिक सॉफ्टवेअर प्रणाली आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय देवस्थानने घेतला आहे. तसेच कर्मचारी व सेवेकऱ्यांची उपस्थिती डिजिटल ट्रॅकिंग प्रणालीद्वारे नोंदवली जाणार असल्याची माहितीही पत्रकार परिषदेत देण्यात आली.
“भाविकांचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी संस्थान कठोर पावले उचलत आहे. या प्रकरणात आणखी कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल,” अशी ग्वाही ॲड उमाप यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रोगापेक्षा वाईट बरा, 10pm कॅप मध्ये oppn फाडणे

0
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की हे उपाय परिणामकारक आहेत पुणे : विरोधी पक्षांनी मंगळवारी पुणे पोलिसांच्या रेस्टॉरंट्ससाठी रात्री 10 वाजता बंद करण्याची...

NEET-UG पेपर लीक प्रकरणी CBI ने पुण्यातील शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून भौतिकशास्त्राचे प्रश्न घेतलेल्या विद्यार्थ्याला अटक...

0
पुणे: NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मंगळवारी संध्याकाळी पुण्यातील शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा हवालदार यांच्याकडून भौतिकशास्त्राचे प्रश्न घेतलेल्या विद्यार्थ्याला अटक केली....

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) राज्यव्यापी आंदोलन करणार आहे

0
राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार पुणे : सरकारने १५ दिवसांत चौथ्यांदा इंधन दरवाढ केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) ने राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची...

पुण्यातील गरवारे पुलावरून कार रेलिंगवरून घसरल्याने मद्यधुंद बीबीएचा विद्यार्थी जखमी

0
पुण्यातील गरवारे पुलावरून कार खाली पडल्याने मद्यधुंद विद्यार्थी. पुणे : किवळे येथील बीबीएचा विद्यार्थी (१९) सोमवारी पहाटे दीडच्या सुमारास जेएम रोडवरील गरवारे पुलाच्या...

समिती अवैध, डॉकेट अशास्त्रीय: रिव्हरफ्रंट प्रकल्पासाठी बालेवाडीत 163 झाडे तोडण्याच्या पीएमसीच्या योजनेला रहिवाशांनी फाटा...

0
पुणे : बालेवाडी येथील मुळा नदीकाठावरील रिव्हरफ्रंट प्रकल्पासाठी पीएमसीच्या 689 पैकी 163 झाडे तोडण्याच्या योजनेला रहिवाशांनी फाडून टाकल्याने सोमवारी औंधच्या 500 आसनी...

Translate »
error: Content is protected !!