Homeताज्या बातम्याआळंदीत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या कौटुंबिक स्नेह मेळावा

आळंदीत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या कौटुंबिक स्नेह मेळावा

आळंदीत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचा कौटुंबिक स्नेह मेळावा
आळंदी ( रवी कदम ) : पुणे जिल्ह्यातील विविध कारणांनी वास्तव्य असलेल्या सेलू जिंतूर विधानसभा मतदार संघातील नागरिक, मतदारांचा कौटुंबिक स्नेह मेळावा आळंदी येथील फ्रुटवाले धर्मशाळेत उत्साहात आयोजित अरण्यात आला.
या प्रसंगी माजी नगराध्यक्षा तथा आळंदी भाजप मंडळ अध्यक्षा वैजयंता उमरगेकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे सदस्य डॉ. राम गावडे, तालुका अध्यक्षा भाजप शांताराम भोसले, संजय घुंडरे, ग्रामीण मंडळ अध्यक्ष अमोल वीरकर, माजी गटनेते पांडुरंग वहिले, माजी नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, दिनेश घुले, राहुल घोलप, रामचंद्र कला कुऱ्हाडे, गणेश सांडभोर, कालिदास वाडेकर, भानुदास साकोरे, माजी सभापती अरुण चौधरी, किरण येळवंडे, शिरीष कारेकर, अविनाश बोरुंदीया आदी मान्यवर उपस्थित होते.
या कौटुंबिक स्नेह मेळाव्यात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आळंदी पंचक्रोशीतील तसेच जिंतूर सेलू मतदार संघातील नागरिक यांनी उत्साही प्रतिसाद या मेळाव्यास होती. या मेळाव्यास राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी संवाद साधत नागरिकांच्या अडीअडचणी सेवा सुविधांची विकास कामे करण्यास कायम प्राधान्य राहील अशी ग्वाही देत संवाद साधला. पुण्यात राहत असलेल्या मतदार, नागरिकांसह आळंदी व पंचक्रोशीतील नागरिकांसाठी मेळाव्याचे आयोजन राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचे समर्थक कार्यकर्ते यांनी आळंदीत केले होते. तत्पूर्वी मेघना बोर्डीकर यांनी माऊली मंदिरात सदिच्छा भेट देऊन श्रींचे दर्शन घेत कौटुंबिक मेळाव्यास हजेरी लावली. यावेळी जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातील आळंदी व पंचक्रोशी परिसरात राहणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला.
कौटुंबिक मेळाव्या पूर्वी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात श्रींचे दर्शन घेत मंदिरात विश्वस्तांशी संवाद साधला. मंदिरात श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त निरंजन नाथ साहेब यांच्या हस्ते राज्यमंत्री बोर्डीकर यांचा श्रीफळ, शाल, ज्ञानेश्वरी प्रत देऊन त्यांचे स्वागत व सत्कार केला. या वेळी त्यांनी श्रींचे दर्शन घेत मन प्रसन्न झाल्याचे सांगितले. राज्यात अतिवृष्टी मुळे बाधित शेतकरी चिंतित आहेत. शेतकऱ्यांचे जीवन सुखी समृद्ध उज्वल व्हावे या साठी तसेच त्यांचे संकट दूर व्हावे म्हणून श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणी प्रार्थना करीत साकडे त्यांनी घातले.
माऊली मंदिर श्रींचे दर्शन झाल्यानंतर जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी आयोजित कौटुंबिक स्नेह मेळाव्यात मोठ्या संख्येने जिंतूर सेलू विधानसभा मतदार संघातील नागरिक उपस्थित होते. नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी बोर्डीकर कुटुंबीयांवर केलेल्या प्रेमामुळे नागरिकांनी दिलेल्या सहकार्याने विधानसभा निवडणुकीत पुन्हा निवडून येता आले असे सांगत नागरिकांच्या अडीअडचणी समस्या कायम सोडवण्यासाठी आपण प्राधान्य देत राहू अशी ग्वाही त्यांनी दिली. आळंदीत आयोजित मिळाव्यात येथील आळंदी ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढ उपजिल्हा रुग्णालयात करून ५० बेड्चे रुग्णालय १०० बेडसाठी विस्तारित दर्जावाढ करून सुविधा उपलब्ध केली जाण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील असे सांगितले. यावेळी पणे जिल्हा अध्यक्ष भाजपा प्रदीप कंद, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे, पिंपरी चिंचवडमधील काही सीएनजी स्टेशन वाहनधारकांना मोठा त्रास देत आहेत

0
पुणे: टाक्यांमध्ये कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) भरणे ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहन मालकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे, या मर्यादेत केवळ 184 CNG...

CME च्या सॅपर्स डे मॅरेथॉनमध्ये सहनशक्ती आणि निसर्गाचे मिश्रण | पुणे बातम्या

0
पुणे: कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग (CME), दापोडी यांनी रविवारी आयोजित केलेल्या मॅरेथॉनमध्ये शहर आणि त्यापलीकडे असलेल्या 8,000 हून अधिक धावपटूंनी फिटनेस, निसर्ग...

🕉️ पंढरपूर ते आळंदी पायी दिंडी सोहळ्याची सुरुवात – हरिनामाच्या गजरात वारकऱ्यांची भक्तिमय यात्रा

0
🕉️ पंढरपूर ते आळंदी पायी दिंडी सोहळ्याची सुरुवात – हरिनामाच्या गजरात वारकऱ्यांची भक्तिमय यात्रा पंढरपूर प्रतिनिधी (|निर्मला पवार) मंगळवार, दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पंढरपूर येथून...

जुनी पुणे कॅन्टोन्मेंट न्यायालयाची इमारत पुनर्विकासाची क्षमता असूनही पडीक आहे

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट कोर्टाचे स्थलांतर होऊन एक वर्षाहून अधिक काळ लोटला तरी एमजी रोडवरील तिची पूर्वीची 120 वर्षे जुनी इमारत कुलूपबंद, जीर्ण आणि विस्मृतीत...

मुंढवा जमीन व्यवहाराच्या विविध पैलूंची चौकशी करण्यासाठी २ पॅनेल

0
पुणे: मुंढवा सरकारी जमीन व्यवहारातील कथित अनियमिततेच्या वेगवेगळ्या पैलूंची स्वतंत्र आदेश आणि मुदत असलेल्या दोन स्वतंत्र समित्या एकाच वेळी चौकशी करतील.नोंदणी आणि मुद्रांक (IGR)...

Translate »
error: Content is protected !!