,(आळंदी प्रतिनिधी रविदास कदम)
आळंदी : श्री आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष तसेच शिवसेना आळंदी शहर प्रमुख माननीय राहुल शेठ ज्ञानेश्वर चव्हाण यांचे पिताश्री आणि आळंदी नगरपरिषद शिक्षण मंडळातील माननीय ज्ञानेश्वर भिकू चव्हाण यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी श्री ज्ञानेश्वर भिकू चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यांच्या पुढील आयुष्याला सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराट लाभो, तसेच उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी करण्यात आली.
या कार्यक्रमात आजी-माजी नगरसेवक, नगराध्यक्ष आणि विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास खेड-आळंदी विधानसभा आमदार बाबाजी काळे, आळंदी नगरपरिषद नगराध्यक्ष प्रशांतदादा कुऱ्हाडे, उपनगराध्यक्ष सुजाता कालिदास तापकीर जिल्हा परिषद माजी सभापती व शिवसेना जिल्हाप्रमुखभगवान शेठ पोखरकर, उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, शिवसेना संपर्क नेते इरफान भाई सय्यद, डी. डी. भोसले, प्रकाश शेठ कुऱ्हाडे, वासुदेव आप्पा घुंडरे, नगरसेवक सचिन गिलबिले, गटनेते व शिवसेना विरुद्ध पक्षनेते आदित्यराजे घुंडरे, मान्यवर पुष्पाताई कुऱ्हाडे उपस्थित होते.
तसेच आळंदी नगरपरिषद माजी अभियंता गिरमे सर, शिवसेना नगरसेवक नाना झोंबाडे, मुख्यमंत्री सहायता निधी प्रतिनिधी जयश्रीताई पलांडे, शिवसेना युवा नेता विशाल आप्पा पोतले, पिंपरी-चिंचवड माजी नगरसेवक धनंजय बापू आल्हाट, नंदू काका वडगावकर, आळंदी नगरपरिषद नगरसेवक दिनेश घुले, अनिकेत तापकीर, उज्वला काळे तसेच आळंदी मनसे अध्यक्ष अजय तापकीर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
आराधना गार्डन येथे हा सेवापूर्ती गौरव समारंभ उत्साहात आणि दिमाखात पार पडला.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























