Homeताज्या बातम्याआळंदीत अयोध्या श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना वर्धापन दिन उत्साहात साजरा

आळंदीत अयोध्या श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना वर्धापन दिन उत्साहात साजरा

आळंदी प्रतिनिधी रविदास कदम)
वारकरी साधकांचा हरिनाम गजरात हरिपाठ; रामरक्षास्तोत्र ग्रंथाचे वाट
येथील श्री आवेकर–भावे श्री रामचंद्र संस्थान, आळंदी (श्री राम मंदिर) यांच्या वतीने अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील प्रभू श्रीरामांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी (दि. २२) इंद्रायणी नदी काठावरील श्री राम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. वेदमंत्रांच्या जयघोषात, पारंपरिक विधी व भक्तिमय वातावरणात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
अयोध्येत २२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्रीराम लल्ला यांच्या मूर्तीची ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठापना व मंदिर लोकार्पण सोहळा पार पडला होता. त्या मंगलमय दिवसाच्या स्मरणार्थ आळंदीत हरिपाठ, हरिनाम गजर, आरती व धार्मिक प्रथा-परंपरांचे पालन करत कार्यक्रम राबविण्यात आले.
या प्रसंगी श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह. भ. प. मोहन महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील वारकरी साधकांनी हरिपाठ सेवा सादर केली. कार्यक्रमाचे संयोजन आवेकर–भावे श्री रामचंद्र संस्थानचे विश्वस्त अर्जुन मेदनकर यांनी केले. हरिपाठ सेवेचे नियोजन ह. भ. प. रामचंद्र महाराज सारंग व ह. भ. प. रवींद्र भूमकर यांनी केले.
कार्यक्रमास श्रींचे पुजारी महेश अयाचित, माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मानकरी ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, गोविंद ठाकूर तौर, आळंदी धाम सेवा संस्थेचे रोहिदास कदम, लक्ष्मण मेदनकर यांच्यासह अनेक मान्यवर व भाविक उपस्थित होते.
महाराष्ट्र ही संतांची व वारकरी संप्रदायाची भूमी असून येथे धार्मिक व सांस्कृतिक परंपरा मोठ्या श्रद्धेने जपल्या जातात. याच परंपरेनुसार या वर्धापन दिनानिमित्त भाविकांना रामरक्षास्तोत्र या ग्रंथाचे वाटप करण्यात आले तसेच प्रसाद म्हणून लाडूंचे वितरण करण्यात आले.
संस्थानचे अध्यक्ष राहुल आवेकर व सर्व विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली श्री राम मंदिरात हा वर्धापन दिन भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरीन वायूची गळती; 24 रुग्णालयात दाखल

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात गुरुवारी क्लोरीन वायू गळती झाल्याने २४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी...

विनाअनुदानित महाविद्यालये खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतरित करण्यासाठी धोरण तयार करण्यासाठी तज्ञांची समिती

0
पुणे : अधिक स्वायत्तता आणि गती मिळावी यासाठी विनाअनुदानित सरकारी महाविद्यालयांचे खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतर करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाने...

एअर इंडियाच्या पुण्याला जाणाऱ्या फ्लायर्ससाठी चाचणीची वेळ

0
पुणे: मंगळवारी रात्री उशिरा एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीहून पुण्याला जाण्यासाठी निघालेले सुमारे 100 प्रवासी उन्हाच्या तडाख्यात एका रखडलेल्या विमानात बसले, उतरले आणि पुन्हा चढले,...

जुन्नरजवळ शेत तलावात दोन मुलांचा बुडून मृत्यू

0
पुणे : पुण्यापासून ९५ किमी अंतरावर असलेल्या जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी येथे मंगळवारी १२ आणि ८ वर्षांच्या दोन मुलांचा शेत तलावात बुडून मृत्यू...

सरकारी जमिनीवरील वादांना आता स्थानिक पातळीवर तोडगा!

0
(मानव मित्र न्यूज प्रतिनिधी रोहिदास कदम ) राज्यातील सरकारी जमिनीच्या व्यवहारांमधील शर्तीभंग प्रकरणांवर आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) विधेयक...

Translate »
error: Content is protected !!