Homeताज्या बातम्याअंधाराशी दोन हात करून जनतेला दिलासा; आघाव साहेब व महावितरण कर्मचाऱ्यांच्या कार्याचा...

अंधाराशी दोन हात करून जनतेला दिलासा; आघाव साहेब व महावितरण कर्मचाऱ्यांच्या कार्याचा नागरिकांकडून गौरव

तीर्थपुरी | प्रतिनिधी राहुल बोबडे
महावितरणच्या तिर्थपुरी (ता. घनसावंगी) शाखेचे वरिष्ठ तंत्रज्ञ एस. बी. आघाव साहेब हे आपल्या कार्यक्षम, कर्तव्यदक्ष आणि जनहिताच्या भूमिकेमुळे परिसरात विशेष ओळख निर्माण करत आहेत. वीज ग्राहकांना अखंडित, जलद आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असून त्यांच्या नेतृत्वाखाली तिर्थपुरी वीज वितरण केंद्राचा कारभार अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे.
आघाव साहेब आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून शिस्तबद्ध व वेळेत काम पूर्ण करण्यावर भर देतात. त्यांच्या प्रभावी नियोजनामुळे वीजपुरवठ्याशी संबंधित अनेक समस्या तातडीने सोडविल्या जात असून ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
विशेष म्हणजे, पाऊस, वादळ, अंधार किंवा कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्या तरी महावितरणचे कर्मचारी व अधिकारी नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असतात. काळोख आणि संकटमय परिस्थितीतही बिनधास्तपणे घटनास्थळी पोहोचून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी जीवाची पर्वा न करता काम करणारे हे धाडसी कर्मचारी खऱ्या अर्थाने जनसेवक आहेत. त्यांच्या मेहनतीमुळे अनेक गावांमध्ये वेळेत वीजपुरवठा पूर्ववत होत असून नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.
ग्राहकांच्या अडचणी समजून घेत त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याची आघाव साहेबांची कार्यपद्धती सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे. त्यामुळे तिर्थपुरी परिसरातील नागरिकांकडून त्यांच्या कामाचे मनापासून कौतुक केले जात आहे.
यावेळी राठोड साहेब, आण्णा जवजे आणि योगेश कायस्थ यांनीही आघाव साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्याची प्रशंसा करत, जनतेसाठी दिवस-रात्र तत्परतेने काम करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा गौरव होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

महावितरणच्या सेवेला अधिक सक्षम व लोकाभिमुख बनविण्यात आघाव साहेबांचे योगदान उल्लेखनीय असून, त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेली संपूर्ण टीम जनतेच्या विश्वासास पात्र ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

PMC 75 नागरी शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी पायाभूत कामे सुरू करणार आहे

0
नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 महापालिका शाळा इमारती आहेत, ज्यात विलीन झालेल्या भागांचा समावेश आहे. पुणे : मॉडेल स्कूल्स (आदर्श शाला) प्रकल्पांतर्गत ओळखल्या...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करू शकते, अशीही अटकळ सुरू आहे. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते

0
पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

चाकणकरांना दिलासा! वर्षानुवर्षे प्रलंबित भाजी मंडई व हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी लागणार?

0
मानव मित्र न्यूज प्रतिनिधी माऊली घुंडरे रस्त्यावरील अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी नगरपरिषदेची मोठी हालचाल चाकण शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कायमस्वरूपी...

विकासक निवडक पुरवठा आणत असल्याने पुण्यातील कार्यालयाच्या रिक्त जागा कमी होत आहेत

0
पुणे : मार्केटमध्ये मर्यादित नवीन पुरवठ्यामुळे पुण्यातील रिकाम्या कार्यालयीन जागांचे प्रमाण जानेवारी ते जून दरम्यान कमी झाले. नाइट फ्रँक इंडियाच्या म्हणण्यानुसार, शहरातील...

Translate »
error: Content is protected !!