बातमी: (प्रतिनिधी अशोक कुंभार)
सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे येथे पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आज मोठा प्रतिसाद मिळाला. विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालय परिसरात गर्दी केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसेच काँग्रेस, भाजप व इतर पक्षांच्या उमेदवारांची व कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती पाहायला मिळाली. सकाळपासूनच उमेदवारांसह समर्थक, पदाधिकारी व नागरिकांनी परिसर गजबजून टाकला होता.
फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान उत्साहाचे वातावरण असून, घोषणाबाजी व पक्षीय शक्तिप्रदर्शनही दिसून आले. आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र या गर्दीवरून स्पष्ट होत आहे.
निवडणूक प्रशासनाच्या वतीने शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पुढील काही दिवसांत प्रचाराला वेग येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. https://youtu.be/3WbGoRLSMZ4

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























