Homeताज्या बातम्यासासवड आगारात एनसीएमसी स्मार्ट कार्ड वाटप उपक्रमाची सुरुवात

सासवड आगारात एनसीएमसी स्मार्ट कार्ड वाटप उपक्रमाची सुरुवात

(सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार,)

सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) – महाराष्ट्र एसटी प्रवासामध्ये डिजिटल सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने सवलतधारक प्रवाशांसाठी एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा नवा डिजिटल उपक्रम आज दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ (शनिवार) रोजी सासवड एसटी आगारात मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आला.

या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्य यांत्रिकी अधिकारी मुंबई सुरेशजी लोणकर, तसेच डीसी मुंबई सेंट्रल माननीय रणवरे साहेब, डीटीओ मुंबई सेंट्रल अजय वनारसे, डीटीएस पुणे गोविंद जाधव उपस्थित होते.

तसेच स्थानिक मान्यवरांमध्ये सासवड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आनंदी काकी जगताप, गंगाराम दादा जगदाळे, दत्ताशेठ काळे (माजी सभापती), नगरसेवक बाळासाहेब भिंताडे, अनिल ढवळे, शिवसेना नेते सुनील येले आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षक (सासवड) यांच्यासह अनेक अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान सेवानिवृत्त कर्मचारी आनंदे साहेब, गद्रे साहेब, राऊत साहेब, मोरे साहेब यांनीही उपस्थित राहून उपक्रमाचे स्वागत केले.

सूत्रसंचालन वाहतूक नियंत्रक जैनक, प्रस्तावना ज्ञानेश्वर रणवरे (डीसी मुंबई) यांनी केली, तर आभार प्रदर्शन कैलास जगताप (वाहतूक नियंत्रक) यांनी केले.

यावेळी पथारी संघटनेचे अध्यक्ष गुलाबराव सोनवणे, अपंग संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ जगताप, आगार लेखाकार मनीषा भोईटे, ट्रॅफिक जीएम अमित वाल्मिकी यांच्यासह अनेक नागरिक स्मार्ट कार्ड काढण्यासाठी उपस्थित होते.

सवलतधारक प्रवाशांसाठी हे एनसीएमसी स्मार्ट कार्ड अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, एसटी प्रवास अधिक सोपा, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने करण्याचा हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

सासवड एसटी आगारात हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला आणि नागरिकांनीही या नव्या डिजिटल सुविधेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील पर्यावरण नियमांचे पालन न करणाऱ्या आरएमसी प्लांट्ससाठी यापुढे मुदतवाढ नाही: एमपीसीबी प्रमुख

0
पुणे: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ गेल्या ऑक्टोबरमध्ये जारी करण्यात आलेल्या पर्यावरणीय निकषांचे पालन न करणाऱ्या रेडी-मिक्स काँक्रीट प्लांटला आणखी सूट देणार नाही,...

Drunk Man Rescue: 8 अग्निशमन दल, 50+ कर्मचाऱ्यांनी तासभर चाललेल्या ऑपरेशनमध्ये महाराष्ट्रातील हाय-टेन्शन टॉवरमधून...

0
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाने सोमवारी रात्री निगडी परिसरात हाय-टेन्शन टॉवरवर चढलेल्या एका व्यक्तीची सुटका केली.काही तास चाललेल्या या ऑपरेशनमध्ये आठ अग्निशमन दल...

1 मे पासून टँकरच्या पाण्याची किंमत 800 रुपयांपर्यंत, उंड्री रहिवाशांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली

0
पुणे: टँकर चालकांनी 1 मे पासून प्रति टँकरचे दर 600 ते 800 रुपयांपर्यंत वाढवून, कोणतीही वाटाघाटी न करण्याचे कठोर कलम जोडल्याने टँकर चालकांनी प्रचंड...

पुणे कॅन्ट बोर्डाने पथदिवे बसवण्यासाठी ४४ लाख रुपये मंजूर केले

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने (पीसीबी) खराब उजेड असलेले रस्ते आणि सुरक्षेच्या वाढत्या चिंतांबाबतच्या तक्रारींनंतर, खराब झालेले पथदिवे दुरुस्त करण्यासाठी अधिकृतपणे 44 लाख...

जुन्नरजवळ समोरासमोर झालेल्या धडकेत नायब तहसीलदाराचा मृत्यू

0
पुणे : ओतूर-जुन्नर रोडवर पुण्यापासून ८८ किलोमीटर अंतरावर असलेल्या पांगरीमाथा गावात शनिवारी दुपारी जुन्नरचे नायब तहसीलदार अनंता गवारी (५२) यांचा कार डंपरशी धडकल्याने त्यांचा...

Translate »
error: Content is protected !!