Homeताज्या बातम्यापुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी.पांगारेगाव परिसरातील डोंगरांना भीषण वनवा; शेतकऱ्याच्या फळबागेसह मोठे नुकसान

पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी.पांगारेगाव परिसरातील डोंगरांना भीषण वनवा; शेतकऱ्याच्या फळबागेसह मोठे नुकसान

पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार)

पुरंदर (पुणे) : पुरंदर तालुक्यातील पांगारे परिसरात ४ मार्च २०२६ रोजी भीषण वनवा लागून डोंगररानाचा मोठा भाग जळून खाक झाला. एका बाजूने लागलेली आग वेगाने पसरत जाऊन जवळपास ९० टक्के डोंगररान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

या आगीत परिसरातील नैसर्गिक गवत पूर्णपणे भस्मसात झाले असून त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या गाई-गुरांसाठी असलेला चारा नष्ट झाला आहे.

दरम्यान, पांगारे (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील गट क्रमांक ८७० मध्ये लागलेल्या आगीत शेतकरी संदीप एकनाथ काकडे यांच्या फळबागेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या शेतातील पेरू, संत्रा, सीताफळ, चिंच व हापूस आंबा या फळझाडांची बाग जळून खाक झाली.

तसेच बागेसाठी बसवलेली एचडीपी काळा गोटा पाईपलाईन, पीव्हीसी पाईप्स आणि ड्रिप इरिगेशनची व्यवस्था आगीत पूर्णपणे जळून गेली.                                                   

वनव्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी मोठ्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

दरवर्षी उन्हाळ्यात या परिसरात वनवे लागण्याच्या घटना घडत असल्याने वनविभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग फसवणूकीमुळे 66 वर्षीय वृद्धाने रु.1 कोटी गमावले

0
पुणे: सायबर चोरांनी साळुंके विहार येथील सेवानिवृत्त अभियंता (६६) यांना गेल्या वर्षी डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान शेअर-ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आश्वासन देऊन एक कोटी...

टुरिस्ट व्हिसावर ‘धार्मिक प्रचार’ केल्याबद्दल 3 अमेरिकन नागरिकांना ‘भारत सोडा’ची नोटीस

0
टुरिस्ट व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन अमेरिकन नागरिकांना पुणे पोलिसांनी 'लिव्ह इंडिया नोटीस' बजावली आहे. पुणे: धार्मिक प्रचार कार्यात सहभागी होऊन पर्यटन...

नियमित VO2 चाचणी रेकॉर्ड-सेटिंग मॅरेथॉनर प्रकट करते

0
विज्ञानाने मार्ग दाखवला. पायांनी ते पार केले. नियमित VO2 कमाल चाचणी — वाढत्या कामाच्या ओझ्याखाली शरीर किती कार्यक्षमतेने ऑक्सिजन वापरते याचे एक...

लोणी काळभोरमध्ये संतापजनक घटना; गुंगीचे औषध देऊन महिलेसोबत अत्याचार

0
( सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार  ) पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. 33 वर्षीय महिलेला...

ILS विधी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या ध्वज शुल्काच्या समस्या आणि प्रशासनातील त्रुटी | पुणे बातम्या

0
संस्थेच्या कार्यपद्धतीत गट सुधारणा शोधतो पुणे: आयएलएस लॉ कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या अध्यक्षांना पत्र लिहून बेकायदेशीर शुल्क वसुली, विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपून टाकणे, पारदर्शकतेचा...

Translate »
error: Content is protected !!