Homeताज्या बातम्यापुण्यातीलMIT art designविद्यार्थ्यांची ऐतिहासिक झेप; ‘प्रोजेक्ट गरुडा’ने रचला विक्रम

पुण्यातीलMIT art designविद्यार्थ्यांची ऐतिहासिक झेप; ‘प्रोजेक्ट गरुडा’ने रचला विक्रम

(पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार)
पुण्यातील MIT Art Design and Technology University मधील विद्यार्थ्यांनी भारतीय एरोस्पेस क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत भारतातील सर्वात मोठे रेडिओ-कंट्रोल्ड (RC) इलेक्ट्रिक फिक्स्ड-विंग विमान यशस्वीरीत्या विकसित केले आहे. ‘टीम स्कायट्रेक’ने तयार केलेल्या या महत्त्वाकांक्षी विमानाला ‘प्रोजेक्ट गरुडा’ असे नाव देण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या एरोस्पेस इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी हे विमान पूर्णपणे स्वतः डिझाईन, विकसित आणि उड्डाण केले. तब्बल ९.२५ मीटर विंगस्पॅन आणि २६१ किलो वजन असलेले हे विमान भारतातील सर्वाधिक वजनाचे आणि सर्वात मोठ्या विंगस्पॅनचे आरसी इलेक्ट्रिक विमान ठरले आहे. या प्रकल्पासाठी ‘CRIEYA’कडून सुमारे ४८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.
या उल्लेखनीय कामगिरीची नोंद India Book of Records आणि Asia Book of Records मध्ये करण्यात आली आहे. विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत अधिकाऱ्यांकडून ‘प्रोजेक्ट गरुडा’ला विक्रमाचे प्रमाणपत्र बहाल करण्यात आले.
दोन अपयशानंतर तिसऱ्यांदा यश
गेल्या चार वर्षांपासून विद्यार्थ्यांनी या प्रकल्पावर सातत्याने मेहनत घेतली. प्रोपल्शन सिस्टीममधील अडथळे, फ्लाइट कंट्रोलर ट्युनिंग, प्रतिकूल हवामान आणि अपयशी चाचण्या अशा अनेक अडचणींवर मात करत अखेर ४ मे २०२६ रोजी धुळे येथील धावपट्टीवर विमानाने यशस्वी टेक-ऑफ, नियंत्रित उड्डाण आणि सुरक्षित लँडिंग केले.
‘गरुडा’ची खास वैशिष्ट्ये
वजन : २६१ किलो
विंगस्पॅन : ९.२५ मीटर
पेलोड क्षमता : १०० किलो
कमाल वेग : ८० किमी प्रतितास
उड्डाण क्षमता : १० मिनिटे
कमाल उंची : १०० मीटर
बॅटरी : Li-Po 220 Ah
बॅटरी व्होल्टेज : १०० व्होल्ट
मार्गदर्शकांचे योगदान
या प्रकल्पाला Dr. Mangesh Karad यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच Dr. Rajesh S., Dr. Sayali Gankar, Dr. Ramchandra Pujeri आणि Dr. Mohit Dubey यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे सहकार्य केले.
या प्रकल्पाला Sheetal Mahajan आणि Captain Amol Yadav यांचेही मार्गदर्शन लाभले आहे.
भविष्यातील योजना.
‘टीम स्कायट्रेक’ भविष्यात ई-व्हीटॉल इलेक्ट्रिक एअर टॅक्सी, स्वॉर्म-ड्रोन सिस्टीम आणि संरक्षण क्षेत्रासाठी प्रगत यूएव्ही संशोधन व्यासपीठ विकसित करण्याच्या दिशेने काम करणार असल्याची माहिती देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते

0
पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

चाकणकरांना दिलासा! वर्षानुवर्षे प्रलंबित भाजी मंडई व हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी लागणार?

0
मानव मित्र न्यूज प्रतिनिधी माऊली घुंडरे रस्त्यावरील अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी नगरपरिषदेची मोठी हालचाल चाकण शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कायमस्वरूपी...

विकासक निवडक पुरवठा आणत असल्याने पुण्यातील कार्यालयाच्या रिक्त जागा कमी होत आहेत

0
पुणे : मार्केटमध्ये मर्यादित नवीन पुरवठ्यामुळे पुण्यातील रिकाम्या कार्यालयीन जागांचे प्रमाण जानेवारी ते जून दरम्यान कमी झाले. नाइट फ्रँक इंडियाच्या म्हणण्यानुसार, शहरातील...

फलकावर ‘कचरा टाकू नका’… पण प्रत्यक्षात कचऱ्याचे साम्राज्य! केळगाव ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा संताप”

0
बातमी मानवमित्र न्यूज संपादक रोहिदास कदम पावसाळ्यात दुर्गंधी, मच्छरांचा प्रादुर्भाव; डेंग्यूसह साथीच्या आजारांचा धोका वाढल केळगाव (ता. खेड, जि. पुणे): स्वच्छतेचे संदेश देणारे फलक लावूनही...

जपानी कंपन्या परदेशी नोकरीच्या संधींसाठी AISSMS अभियांत्रिकी विद्यार्थ्यांशी संलग्न आहेत

0
एआयएसएसएमएस येथे आयोजित जागतिक करिअरच्या उभारणीवर अभिमुखता कार्यक्रम पुणे : जपानमध्ये कुशल अभियंत्यांची मागणी सतत वाढत असल्याने जपानी उद्योगातील एका शिष्टमंडळाने अलीकडेच AISSMS...

Translate »
error: Content is protected !!