Homeताज्या बातम्यानाथांच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी; वीर येथे श्रीनाथ म्हस्कोबा महाराज यात्रा उत्सव...

नाथांच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी; वीर येथे श्रीनाथ म्हस्कोबा महाराज यात्रा उत्सव उत्साहात

पुरंदर सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार)
पुरंदर : पुणे जिल्ह्यातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची यात्रा वीर येथे मोठ्या उत्साहात सुरू आहे. माघ पौर्णिमा ते दशमी अशा दहा दिवसांच्या कालावधीत पार पडणारा हा यात्रा उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे.
१ फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमेच्या दिवशी यात्रेची सुरुवात झाली असून १२ फेब्रुवारी रोजी यात्रेची सांगता होणार आहे. आज यात्रेचा आठवा दिवस असून श्रीनाथांच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. यावेळी देवाचा छबिना पार पडला. देवाचा संचार भक्तांच्या अंगात आल्यानंतर पारंपरिक तलवार खेळवण्याची प्रथा भक्तांनी सादर केली.
कोडीत, कने-ही, राजेवाडी आदी विविध गावांच्या पालख्या वीर येथे दहा दिवस मुक्कामी असतात. दशमीच्या दिवशी रंगाची मारामारी झाल्यानंतर यात्रेची सांगता केली जाते.
नवसाला पावणारा देव म्हणून श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे देवस्थान संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असून राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येथे दाखल होत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

IAF जेटच्या ‘हार्ड लँडिंग’ घटनेनंतर पुणे विमानतळ पुन्हा सुरू झाले

0
पुणे: भारतीय हवाई दलाच्या विमानाचा समावेश असलेल्या घटनेमुळे काही तासांच्या व्यत्ययानंतर, शनिवारी सकाळी पुणे विमानतळावरील कामकाज पुन्हा सुरू झाले, अधिकाऱ्यांनी धावपट्टी पूर्ववत...

निष्काळजीपणामुळे बाळाच्या मृत्यूप्रकरणी 4 डॉक्टर, 2 परिचारिकांवर एफआयआर

0
पुणे : गेल्या वर्षी अकरा महिन्यांच्या बालिकेच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणा आणि फसवणूक करून मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी नवी पेठेतील चिन्मय नर्सिंग होमच्या चार बालरोगतज्ज्ञ आणि दोन...

मर्यादित पुरवठ्यावर कार्यालयाचे भाडे स्थिर आहे

0
पुणे: शहरातील व्यावसायिक जागांसाठी भाडेतत्त्वावरील भाडे स्थिर राहिल्याने विकासकांनी कार्यालयीन शोषण कमी होण्याची चिन्हे दाखवूनही नवीन पुरवठा प्रतिबंधित करणे सुरू ठेवले आहे.नाइट...

डॉक्टर दुर्मिळ लांब-सेगमेंट स्पाइनल कॉर्ड ट्यूमर काढून टाकतात ज्यामध्ये ब्रेनस्टेमचा समावेश होतो

0
पुणे : सह्याद्री रुग्णालयातील न्यूरोसर्जिकल टीमने रुग्णाच्या पाठीच्या कण्यातील 16.5 सेमी लांबीची गाठ यशस्वीरित्या काढली आहे. दुर्मिळ, लांब-सेगमेंट ट्यूमर ब्रेनस्टेमपासून, मानेच्या मणक्याद्वारे...

शिवमय वातावरण; संस्कृतनादात गुंजली शिवपुराण कथा, वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
आळदीदेवाची. संपादक रोहिदास कदम) महिला अखंड हरिनाम सप्ताह, श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळा व तपपूर्ती सोहळा निमित्त आयोजित संगीतमय देखाव्यासह शिवपुराण कथेमुळे आळंदी नगरी सध्या...

Translate »
error: Content is protected !!