Homeताज्या बातम्याचाकण शहरातील P1-P2 पार्किंग कारवाई स्थगित करण्याची मागणी; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे...

चाकण शहरातील P1-P2 पार्किंग कारवाई स्थगित करण्याची मागणी; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांचे पोलीस आयुक्तांना पत्र

आळंदी (प्रतिनिधी रविदास कदम)पोलीस आयुक्तांना पत्र
चाकण : चाकण नगरपरिषद हद्दीतील P1 व P2 पार्किंग व्यवस्थेअभावी वाहनांवर टोईंग करून करण्यात येणारी कारवाई तात्काळ स्थगित करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गुलाबराव गोरे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात त्यांनी लेखी पत्र देत चाकण शहरात सध्या पुरेशी, नियोजित आणि सक्षम पार्किंग व्यवस्था उपलब्ध नसल्याचे नमूद केले आहे. चाकण हे वेगाने विकसित होणारे औद्योगिक शहर असून येथे स्थलांतर, व्यापारी उलाढाल आणि वाहनसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र त्यानुसार पार्किंगचे नियोजन करण्यात आले नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शहरातील व्यापारी, फेरीवाले, कामगार आणि सर्वसामान्य नागरिक पर्यायी पार्किंग व्यवस्थेअभावी रस्त्याच्या कडेला वाहने उभी करत आहेत. अशा परिस्थितीत वाहतूक पोलिसांकडून टोईंगद्वारे करण्यात येणारी कारवाई नागरिकांसाठी आर्थिक भुर्दंड ठरत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
नितीन गोरे यांनी पत्रात नमूद केले की, चाकण नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेतही संबंधित कारवाई रद्द करण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला आहे. तसेच शहराचा विकास आराखडा अंतिम होऊन आवश्यक पार्किंग सुविधा निर्माण होईपर्यंत P1-P2 पार्किंग झोनमधील दंडात्मक कारवाई थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर अभियानांतर्गत आंबेजोगाई येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे....

PMC 75 नागरी शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी पायाभूत कामे सुरू करणार आहे

0
नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 महापालिका शाळा इमारती आहेत, ज्यात विलीन झालेल्या भागांचा समावेश आहे. पुणे : मॉडेल स्कूल्स (आदर्श शाला) प्रकल्पांतर्गत ओळखल्या...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करू शकते, अशीही अटकळ सुरू आहे. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी...

Translate »
error: Content is protected !!