Homeताज्या बातम्याएमआयटी एडीटी विद्यापीठात राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात

एमआयटी एडीटी विद्यापीठात राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात

बातमी अशोक कुंभार प्रतिनिधी

लोणी-काळभोर (पुणे) : MIT Art, Design and Technology University येथे आयोजित राज्यस्तरीय आमंत्रित मुष्ठीयुद्ध (बॉक्सिंग) स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. ही स्पर्धा विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती Dr. Mangesh Karad यांच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आली होती.

स्पर्धा बँटमवेट, लाईटवेट, वेल्टरवेट, लाईट मिडलवेट, मिडलवेट, लाईट हेवीवेट, क्रूझरवेट आणि हेवीवेट अशा विविध वजन गटांमध्ये रंगली. स्पर्धेचे उद्घाटन अर्जुन पुरस्कारप्राप्त मुष्ठीयोद्धा Captain Gopal Dewang तसेच ऑलिम्पियन व अर्जुन पुरस्कारप्राप्त Manoj Pingale यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कुलगुरू Dr. Rajesh S, प्रोवोस्ट Dr. Sayali Ganakar, प्र.कुलगुरू Dr. Nachiket Thakur, क्रीडा विभाग संचालक व शिवछत्रपती पुरस्कार विजेते Prof. Padmakar Phad, तसेच Dr. Atul Patil यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेअंती सर्व वजन गटांतील विजेत्यांना सुवर्णपदके, तर उपविजेत्यांना रौप्यपदकांसह एक लाख रुपयांहून अधिक पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेत राज्यातील विविध नामांकित बॉक्सिंग अकादमींच्या खेळाडूंनी सहभाग घेत निकराच्या लढती सादर केल्या. विशेषतः युवा विकास मंच, मनोज पिंगळे क्रीडा अकादमी, नॉकआउट बॉक्सिंग अकादमी, मुंबई बॉक्सिंग अकादमी, स्टार बॉक्सिंग अकादमी, कोंढवा बॉक्सिंग अकादमी, खराळवाडी बॉक्सिंग अकादमी, के.डी. बॉक्सिंग अकादमी, बीएमएसए अकादमी, बीव्हीजीपी बॉक्सिंग अकादमी आणि डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी क्रीडा अकादमी यांचा सहभाग लक्षणीय ठरला.

स्पर्धेतील मिडलवेट गटात (७० ते ७५ किलो) के.डी. बॉक्सिंग अकादमी, मुंबईचा मिथेश राठोड याला ‘सर्वोत्कृष्ट बॉक्सर’ पुरस्कार मिळाला. तर हेवीवेट गटात (८५ ते ९० किलो) एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या आर्या औटी हिला ‘सर्वोत्कृष्ट चॅलेंजर’ म्हणून गौरविण्यात आले.

या राज्यस्तरीय स्पर्धेमुळे युवा खेळाडूंना आपली प्रतिभा सादर करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले असून क्रीडा क्षेत्रात नव्या उंची गाठण्यास प्रेरणा मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्री क्षेत्र मरकळ येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिभावात संपन्न; धार्मिक विधी, पालखी सोहळा आणि महाप्रसादासाठी...

0
मरकळ,( प्रतिनिधी रोहिदास कदम)गुरुतत्त्वाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा आणि अध्यात्माची अनुभूती देणारा गुरुपौर्णिमा महोत्सव यंदा श्री क्षेत्र मरकळ येथील पंचलिंग देवस्थान दत्तभक्त ताई माऊली मठात...

गुरुपौर्णिमेनिमित्त मातोश्री चंद्रभागा आश्रमात भक्तिमय वातावरणात गुरुपूजन व कीर्तन सोहळा संपन्न

0
अंबाजोगाई, प्रतिनिधी (मेघा चाटे) : परळी वैजनाथ तालुक्यातील मातोश्री चंद्रभागा आश्रम, वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वेस तुकाई रोड येथे परमपूज्य वै. ह. भ. प. गुरुवर्य मृदंड...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

0
पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

Translate »
error: Content is protected !!