Homeताज्या बातम्याएअर रायफल ज्युनियर वर्ल्डकपसाठी आळंदीच्या प्रीतम तुकाराम केंद्रेची निवड; शहरात आनंदाचे वातावरण

एअर रायफल ज्युनियर वर्ल्डकपसाठी आळंदीच्या प्रीतम तुकाराम केंद्रेची निवड; शहरात आनंदाचे वातावरण

,(आळंदी प्रतिनिधी रविदास कदम)

आळंदी : 10 मीटर एअर रायफल ज्युनियर वर्ल्डकप स्पर्धेसाठी आळंदीतील युवा नेमबाज प्रीतम तुकाराम केंद्रे यांची निवड झाल्याने शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे पार पडलेल्या सिलेक्शन ट्रायल्समध्ये उत्कृष्ट कामगिरी करत त्यांनी हे यश संपादन केले.

विविध राज्यांमधून सहभागी झालेल्या 600 पेक्षा अधिक स्पर्धकांमध्ये प्रीतमने 632.2 गुण मिळवत ज्युनियर गटात तिसरे स्थान मिळवले. सध्या ते महाळुंगे (पुणे) येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असून गन फॉर ग्लोरी शूटिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षक किरण खंडरे व शुभम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. पुढील महिन्यात केरो (इजिप्त) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ते भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

या उल्लेखनीय यशाबद्दल आळंदी नगरपरिषदेत नगरसेवक दिनेश घुले यांच्या पुढाकाराने प्रीतम केंद्रे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष प्रशांतदादा कुऱ्हाडे मुख्याधिकारी माधव खांडेकर, गटनेते सचिन गिलबिले, ज्ञानेश्वर वाघमारे आणि दीपक काळे उपस्थित होते.                             

यावेळी नगराध्यक्ष प्रशांतदादा कुऱ्हाडे म्हणाले, “प्रीतमने कठोर परिश्रम व सातत्याच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्थान मिळवले आहे. हे आळंदीकरांसाठी अभिमानास्पद असून शहरातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल. क्रीडा क्षेत्राला आवश्यक ते सहकार्य देण्यासाठी नगरपालिका कटिबद्ध आहे.”.                                         

प्रीतम केंद्रे यांच्या या कामगिरीमुळे आळंदी शहराचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तज्ज्ञांनी भारतीय मुलांमध्ये ‘लीन’ फॅटी लिव्हर रोगाचा इशारा दिला आहे

0
पुणे : भारतात सार्वजनिक आरोग्यामध्ये शांत पण चिंताजनक बदल होत आहे. आज जागतिक यकृत दिनानिमित्त, हेपॅटोलॉजिस्ट्सनी चेतावणी दिली की नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD)...

सरकारी शाळांमधील एआय टूल्स विद्यार्थ्यांना शिकण्यात, मूलभूत गणितांमध्ये मदत करतात

0
पुणे : मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता तिसरीचा विद्यार्थी यश खोमणे याने गेल्या वर्षीपर्यंत क्वचितच वर्गात उत्तर देण्यासाठी हात वर केला होता. तो मूलभूत...

आळंदी मंदिरात अक्षय तृतीया दिनी श्रींचे विठ्ठल रूप चंदनउटी — भाविकांची मोठी गर्दी

0
  आळंदी (अशोक कुंभार प्रतिनिधी ) : अक्षय तृतीया निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर येथे श्रींचे वैभवी विठ्ठल रूप चंदनउटीद्वारे साकारण्यात आले....

AFMC डॉक्स पुणे कँट हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया काळजी वाढवतात

0
पुणे: सरदार वल्लभभाई पटेल पुणे कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलने आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (एएफएमसी) ने आपले विशेष डॉक्टर सुविधेवर तैनात केल्यानंतर शेकडो रुग्णांसाठी...

एनसीडब्ल्यूने परतवाडा प्रकरणातील आरोपींवर कठोर आरोपांची मागणी केली आहे

0
पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) अधिकाऱ्यांना अमरावतीमधील परतवाडा प्रकरणाच्या संदर्भात फॉरेन्सिक विश्लेषण जलदगतीने करण्याचे आणि दर पाच दिवसांनी प्रगती अहवाल सादर करण्याचे...

Translate »
error: Content is protected !!