Homeताज्या बातम्याआळंदी नगरपरिषदेकडून पर्यावरणाचा खेळखंडोबा? कचरा डेपोमध्ये सर्रास कचरा जाळण्याचा प्रकार!

आळंदी नगरपरिषदेकडून पर्यावरणाचा खेळखंडोबा? कचरा डेपोमध्ये सर्रास कचरा जाळण्याचा प्रकार!

आळंदी (रवी कदम) : संतांची नगरी आळंदीमध्ये कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून आळंदी नगरपरिषदेच्या कचरा डेपोमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया प्रभावीपणे राबविली जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. कचऱ्याचे वर्गीकरण, प्रक्रिया आणि वैज्ञानिक विल्हेवाट लावण्याऐवजी सर्रास कचरा जाळला जात असल्याने परिसरात धुराचे लोट, तीव्र दुर्गंधी आणि प्रदूषणाचे संकट निर्माण झाले आहे.
केळगाव येथील स्थानिक नागरिक संदीपभाऊ मुंगसे यांनी सांगितले की, डेपोमध्ये वारंवार कचरा जाळला जात असल्याने केळगावसह पंचक्रोशीतील नागरिकांना श्वसनाचे विकार, डोळ्यांची जळजळ, दम लागणे अशा विविध आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे पाऊस पडल्यानंतर सर्व घाण पाणी तळ्यात येऊन जमा होते तळ्यामध्ये मुके जनावर पाणी पितात व जनावराची हानी झालेली आहे व आजारपण येत आहे. धुरामुळे अनेक नागरिकांच्या डोळ्यांची आग होत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कचरा डेपोमध्ये कोणतेही प्रभावी वर्गीकरण किंवा प्रक्रिया होत नसून कचऱ्याचे ढिगारे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे परिसरात माशा, मच्छर आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढला असून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन त्रस्त झाले आहे.
विशेष म्हणजे, शासनाकडून तीर्थक्षेत्र विकासासाठी आणि विविध योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होत असताना कचरा व्यवस्थापनासारख्या मूलभूत प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अनेक वेळा तक्रारी, निवेदने आणि पाठपुरावा करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
नागरिकांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि नगरविकास विभागाने तात्काळ हस्तक्षेप करून कचरा डेपोची प्रत्यक्ष पाहणी करावी, कचरा जाळण्याचे प्रकार थांबवावेत आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र नगरीत एकीकडे स्वच्छतेच्या घोषणा दिल्या जात असताना दुसरीकडे कचरा डेपोमधून निघणाऱ्या धुराने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. “कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सुटणार की नागरिकांना धुरातच जगावे लागणार?” असा संतप्त सवाल आता केळगाव पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित करत आहेत.
मानव मित्र न्यूजचा सवाल
कचरा व्यवस्थापनासाठी निधी आहे, यंत्रणा आहे, मग कचरा जाळण्याची वेळ का येते? नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार?

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्याच्या पुरंदर विमानतळाच्या जमिनीसाठी ७०% संमती, मुदतवाढीचा निर्णय प्रलंबित

0
पुणे : प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन संमती प्रक्रिया 70% पर्यंत पोहोचली आहे, प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या एकूण 1,285 हेक्टरपैकी सुमारे 851 हेक्टरसाठी...

नसरापूर खटला निर्णायक टप्प्यात; 48 साक्षीदार तपासण्यात आल्याचे सरकारी वकिलांचे म्हणणे आहे

0
आजपर्यंत एकूण 48 साक्षीदार तपासण्यात आले पुणे: नसरापूर बलात्कार आणि खून खटल्यातील खटला निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, आतापर्यंत 48 फिर्यादी साक्षीदार तपासले गेले...

हिडमा मडावी गाण्यावर नृत्य प्रकरण; दोन विद्यार्थ्यांना अटकपूर्व जामीन

0
पुणे | मानव मित्र न्यूज रविदास कदम विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दोन विद्यार्थ्यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. आर. शेट्टी यांच्या न्यायालयाने अटी-शर्तींसह अटकपूर्व...

एनसीसी महाने रोजगारक्षमता मोहीम सुरू केली

0
पुणे : NCC महाराष्ट्राने पंतप्रधान इंटर्नशिप स्कीम (PMIS) अंतर्गत एकात्मिक रोजगारक्षमता उपक्रम सुरू केला आहे, ज्याचा उद्देश एनसीसी कॅडेट्स आणि माजी कॅडेट्सना...

पुण्यातील तळेगाव एमआयडीसी युनिटमध्ये देखभालीदरम्यान CO₂ लीक झाल्याने 2 ठार, 3 जखमी

0
AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे: तळेगाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसरातील बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशन (एमएनसी) प्लांटमध्ये मंगळवारी दुपारी देखभालीच्या कामात...

Translate »
error: Content is protected !!