Homeताज्या बातम्याअपंग भावाच्या हक्कावर वकील भावाचा डल्ला? वहिवाटीचा रस्ता रोखल्याचा गंभीर आरोप

अपंग भावाच्या हक्कावर वकील भावाचा डल्ला? वहिवाटीचा रस्ता रोखल्याचा गंभीर आरोप

काळदरी (प्रतिनिधी अशोक कुंभार:)नातेसंबंध, माणुसकी आणि भावकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना काळदरी येथे समोर आली आहे. स्वतःच्या मोठ्या भावाने कष्टाचे पैसे खर्च करून शिकवून वकील बनवलेल्या लहान भावावरच आता अपंग मोठ्या भावाच्या शेतीवर डोळा ठेवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय किसनराव थोपटे यांनी आयुष्यभर शेतीत राबून आपल्या कुटुंबासह लहान भाऊ मोहन किसनराव थोपटे यांना उच्च शिक्षण दिले. मात्र, २००७ मध्ये झालेल्या भीषण अपघातात दत्तात्रय थोपटे यांना कायमचे अपंगत्व आले. त्यानंतर कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले.
पीडित कुटुंबाच्या आरोपानुसार, या परिस्थितीचा फायदा घेत लहान भावाने मोठ्या भावाच्या शेतीवरील हक्कांवर गदा आणण्यास सुरुवात केली. शेतात जाणाऱ्या पिढ्यानपिढ्यांच्या वहिवाटीचा रस्ता रोखण्यात आल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत. तसेच शेतात ट्रॅक्टर जाऊ नये यासाठी संबंधितांना दमदाटी करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
पीडित कुटुंबीयांनी सांगितले की, अपंग पती, पत्नी आणि मुलांवर सातत्याने मानसिक दबाव निर्माण केला जात असून न्याय मागण्यासाठी प्रशासनाचे दरवाजे ठोठावण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. रस्ता बंद झाल्यामुळे शेती करणे अशक्य झाले असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजाला न्याय देण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तीवरच अन्याय केल्याचा आरोप होत असल्याने ग्रामस्थांकडूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा आणि वहिवाटीचा रस्ता तातडीने खुला करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
“ज्याला शिकवून वकील बनवलं, त्याच भावाने अपंग भावाचाच रस्ता रोखला?”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

YCMOU 135 अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू करतो

0
YCMOU मध्ये पारंपारिक आणि नवीन युगातील अभ्यासक्रमांचे मिश्रण आहे पुणे: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने (YCMOU) 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी 13 विद्याशाखांमधील 135...

रस्ते पूर, वाहतूक कोलमडणे आणि गोंधळ उडाला: दोन दिवसांच्या पावसामुळे पुण्यातील पायाभूत सुविधांची पडझड...

0
म्हाळुंगेजवळील पुणे-बेंगळुरू महामार्गाच्या सर्व्हिस रोडच्या काही भागात पावसामुळे पाणी साचले होते. पुणे : अवघ्या दोन दिवसांच्या पावसाने शहरातील रस्ते आणि ड्रेनेज इन्फ्रास्ट्रक्चरची नाजूक...

🇮🇳 रासे गावच्या भूमिपुत्राचा अभिमानास्पद गौरव! २४ वर्षे भारतीय सैन्यात देशसेवा करून जयेश शिंदे...

0
रासे (प्रतिनिधी माऊली घुंडरे) : देशसेवा हीच ईश्वरसेवा मानत तब्बल २४ वर्षे भारतीय सैन्य दलात प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणारे रासे गावचे सुपुत्र जयेश मारुती शिंदे...

विधानपरिषद उपसभापतीपदी सचिन अहिर यांचा विजय; शिवसेनेच्या सर्व प्रतिनिधींचे मतदान

0
पुरंदर सासवड|प्रतिनिधी अशोक कुंभार महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार Sachin Ahir यांचा दणदणीत विजय झाला आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या सचिन...

राज्यात केवळ १.२८ लाख, ३.१२ कोटी नाही, भू सर्वेक्षण प्रकरणे प्रलंबित, बावनकुळे म्हणतात

0
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुणे : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधानसभेत लेखी उत्तरात सांगितले की, महाराष्ट्रात १.२८ लाख भू सर्वेक्षण प्रकरणे...

Translate »
error: Content is protected !!